अखेर अनावश्यक रस्त्याचे काम रोखले : दुरूस्तीवर निभावले !
उल्हासनगर महापालिकेने ब्लाॅक ए-५०२ ते अश्वमेघ अपार्टमेंट दरम्यान पक्का रोड खणुन नव्याने सीसी रोडचे काम स्थानिक नगरसेवकाने सुरू केले होते. या अनावश्यक कामामुळे महापालिकेच्या सुमारे १५ लाख रूपयांच्या निधीचा अपव्यय होणार होता.
सदर बाब मी कालच माननीय आयुक्तांच्या निदर्शनास आणुन दिली होती.मा.आयुक्तांनी माझ्या तक्रारीची तातडीने व गांभीर्याने दखल घेऊन शहर अभियंता सोळंकी यांना निर्देश दिले. पाहणीअंती माझ्या म्हणण्यात तथ्य आढळल्याने नवीन रस्ता बनविण्याचे काम रहित करून जुन्या सीसी रोडची डागडुजी करण्याचे ठरले.त्यामुळे महापालिकेच्या १५ लाखाच्या निधीचा अपव्यय रोखला गेला आहे.तसेच रस्त्यावर रस्त्याचे थरांवर थर चढवल्याने रस्त्याची वाढणारी उंची व त्यामुळे स्थानिक इमारतींचे प्रवेश द्वार खाली गेल्याने होणारी गैरसोय देखील दूर झाली आहे.
आपण फक्त करदाते नसून आपण या शहराचे जागृत नागरीक आहोत.
त्यामुळे आपण कर रूपी दिलेल्या महसुलावर कोणी दरोडा टाकत असेल तर ते रोखणे हे देखील आपले कर्तव्य आहे. मी माझे कर्तव्य बजावले लोकांनी देखील नगरसेवकांच्या राग लोभाची पर्वा न करता अशी अनावश्यक कामं रोखुन हे “दरोडे” थांबवले पाहिजेत.
दुनिया झुकती है,झुकानेवाला चाहिये ! भ्रष्टाचार रोखणे ही देखील समाज सेवा आहे, या भावनेने काम केले तर मोठ्या प्रमाणात आपल्याच निधीवरील दरोडे थांबतील !
या प्रकरणा माननीय आयुक्त अजिज शेख साहेब व शहर अभियंता सोेळंकी यांनी तत्परतेने लक्ष घालून तक्रारीचे निवारण केले,या बद्धल त्यांचे मनापासून आभार व
अभिनंदन !
दिलीप मालवणकर
ज्येष्ठ पत्रकार
माजी नगरसेवक
९८२२९०२४७०