हर्षवर्धन पाटील यांनी घेतले बाबीर देवाचे दर्शन!
जनतेच्या सुख-समृद्धीसाठी साकडे
रुई येथे भाविकांची साधला संवाद !
इंदापूर :प्रतिनिधी. भगवान लोंढे दि.27/10/22
माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील रुई येथील प्रसिद्ध श्री बाबीर देवाची यात्रेनिमित्त पूजा करून गुरुवारी (दि.27) दर्शन घेतले. यावेळी राज्यातील जनतेच्या सुख समृद्धीसाठी बाबीर देवाकडे हर्षवर्धन पाटील यांनी साकडे घातले.
रुई येथील राज्यभर प्रसिद्ध असलेल्या बाबीर देवाची ची यात्रा कालपासून सुरू झाली आहे. बाबीर बुवा हे आपले सर्वांचे श्रद्धास्थान आहे. लहानपणापासून प्रत्येक वर्षी मी इथे यात्रेसाठी येऊन बाबीर देवाचे आशीर्वाद घेत असतो. बाबीर देवाचे दर्शन घेतल्यावर वेगळी प्रेरणा मिळते व त्यापासून निर्माण झालेला उत्साह कायम ऊर्जा देत असतो, असे गौरवोद्गार यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी काढले.
आपले सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या बाबीर देवाची यात्रा दिवसेंदिवस वाढत चालली आहे, असे हर्षवर्धन पाटील नमूद केले. यावेळी त्यांनी यात्रेसाठी राज्यभरातून आलेल्या भाविकांशी संवाद साधला. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाने दक्ष रहावे, अशी सूचनाही याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी संबंधितांना दिली. यावेळी बाबीर देवस्थान ट्रस्टच्या वतीने हर्षवर्धन पाटील यांचा सत्कार करण्यात आला.