अष्टविनायक महामार्गातील अडथळे नगरपरिषदेने त्वरित दूर करावे आम आदमी पार्टीची मागणी
प्रतिनिधी – विकी ओहोळ
दौंड – दौंड शहरातून जाणाऱ्या अष्टविनायक महामार्गालगत असलेल्या सिध्दार्थ नगर येथील रस्त्याच्या कडेला सुमारे 200 मीटर चा एक पट्टा नगर पालिकेच्या पिण्याच्या पाइप लाइन चे व नळ जोडणी काम सुमारे वर्षभर बंद आहे, नळ जोडणी पूर्ण झाल्याशिवाय रस्त्याच्या कामे पूर्ण करू शकत नाही असे सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितले त्यामुळे रस्त्याची एकच लेन चालु असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे व अनेक वेळा अपघात सुध्दा झाले आहे तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे गटाराचे काम अर्धवट सोडून दिले आहे त्याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे असा आशयाचे निवेदन आम आदमी पार्टीने दौंड नगरपालिकेला दिले आहे व निवेदनाचा किती गांभर्याने विचार केला जातो ते पाहू असे आम आदमी पार्टीचे रवींद्र जाधव यांनी मत व्यक्त केले.