July 1, 2025 9:58 am

दौंड येथे माहिती अधिकार दिन विविध कार्यक्रमांनी साजरा

अपनी भाषा में पढ़े! Translate

दौंड येथे माहिती अधिकार दिन विविध कार्यक्रमांनी साजरा
दौंड प्रतिनिधी/विकी ओहोळ

दौंड – रोटरी क्लब ऑफ दौंड आयोजित व पंचायत समिती दौंड, न्यु महाराष्ट्र पँथर सेना महाराष्ट्र राज्य यांचे संयुक्त विद्यमाने दौंड पंचायत समिती हॉल मध्ये येथे विविध कार्यक्रम घेण्यात आले . कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून जयदीप बगाडे RTI कार्यकर्ते यांनी 2005 माहिती अधिकार कायद्याच्या संदर्भात सविस्तर माहिती दिली व प्रशासकीय अधिकारी,RTI कार्यकर्ते,सर्व सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना सविस्तर उत्तरे दिली यावेळी खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये प्रथम तीन क्रमांक जि.प शाळा जाधववाडी (गिरीम)

  1. ऋतुजा संतोष जाधव
    2.प्रेम विश्वनाथ फुलारी
    3.रूक्मिणी ज्ञानेश्वर वायसे कनिष्ठ सहाय्यक ग्रामपंचायत विभाग पंचायत समिती दौंड यांना देण्यात आले स्पर्धेसाठी उस्फुर्त प्रतिसाद मिळाला ज्यांनी सहभाग घेतला त्या सर्वांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तसेच माहिती अधिकार कायदा पुस्तक वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष करमकर गट शिक्षण अधिकारी यांनी माहिती अधिकार कायदा हा सर्व सामान्य नागरिकासाठी बनवला आहे प्र शासकीय अधिकारी यांनी या कायद्याचे काटेकोर पालन करावे असे आवाहन केले व मुख्य कार्यक्रमाचे अध्यक्ष अजिंक्य येळे गट विकास अधिकारी प.स.दौंड होते. तर प्रमुख पाहुणे डॉ. राजेश दाते अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ दौंड या कायद्याचा वापर सर्वांनी करावा असे नागरिकांना सांगितले.
    RTI कार्यकर्ते यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रहीम शेख यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिनेश अडसूळ कृषी अधिकारी यांनी केले व आभार प्रदर्शन पोपट कुंभार यांनी केले या कार्यक्रमास मोठ्या संख्येने प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, तरुण वर्ग व सर्व सामान्य नागरिक सर्व पक्ष संघटना मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!