माजुर्ड्या मिंध्यांचा माज उतरला
बुरी नजर वालेचा मुंह काला झाला !
सत्तेचा माज चढून उन्मत्त झालेल्या मिंधे सरकारचा माज खाटकन उतरला ! मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेच्या वतीने शिवतीर्थावर पारंपारिकरित्या संपन्न होणा-या दसरा मेळाव्यास परवानगी देऊन मिंधे सरकारच्या काळ्या मांजराचा या मेळाव्यात आडवे जाऊन अपशकुन करण्याचा डाव उढळून लावत त्यांना सणसणीत चपराक लगावली. अशा प्रकारे शिवसेनेवर बुरी नजर ठेवणा-यांचे तोंड काळे झाले.
आपल्या आयुष्यातील 35 वर्षाहून अधिक काळ शिवसेनेचे अन्न खाऊन माजलेले एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या मुळावरच उठले.दिल्ली पतपात शहा ला रिझविण्यासाठी, त्याची खप्पा मर्जी होऊन इडिची पीडा मागे लागू नये, मुलाचे दिल्लीतील प्रकरण वायरल होऊ नये, औटघटकेसाठी गद्दारीच्या बदल्यात मिळालेली सरदारकी टिकून रहावी, यासाठी दिल्ली पतपात शहाचे चरणदास झालेले मिंधे इतके लाचार व हतबल झाले की ते कधीतरी शिवसेनेचे वाघ होते यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब पश्चातापदग्ध होऊन या गद्दाराला मोठे केल्याबद्दल शोक व्यक्त करीत असतील.
शिवसेनेची स्थापना 19 जून 1966 रोजी झाली व शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा 30 आक्टोंबर 1966 साली झाला. तेंव्हा हा 2 वर्षाचा मिंद्या चड्डीत होता.तेंव्हापासून कोरोनाचा दोन वर्षांचा अपवाद वगळता एकच मैदान,एकच नेता, एकच झेंडा मिरवत 50 वर्ष अखंडितपणे शिवसेनेचा दसरा मेळावा वाजत गाजत, गुलाल व विचारांचे सोनं उधळत दिमाखात साजरा होत होता. बाळासाहेबांच्या देहवासनानंतर उद्धव ठाकरे यांनी ही परंपरा अखंडितपणे सुरू ठेवली. या वर्षी देखील दसरा मेळावा साजरा करण्यासाठी मुंबई महापालिकेकडे रितसर अर्ज करताच महापालिकेने सत्ताधा-यांच्या दबावा खाली परवानगी नाकारून व आपल्या अधिकारांचा गैरवापर करून परवानगी नाकारण्याचा नालायकपणा केला. पोलीसांनी देखील मिंधेगिरी करून कायदा सुव्यवस्थेचा बागुलबुवा करून खो घालण्याचा लाजिरवाणा प्रकार केला.
या प्रकरणी मिंधे सरकारचे गारदी सदा गरळ ओकणारा सरवणकर याने मुंबई उच्च न्यायालयात हस्तक्षेप करणारी याचिका दाखल करून काळ्या मांजरासारखा आडवा गेला. अखेर मुंबई उच्च न्यायालयाने मिंद्यांची हस्तक्षेप याचिका फेटाळून लावत सणसणीत चपराक लगावली. त्याबरोबरच महाराष्ट्रात जल्लोष साजरा करण्यात आला. ये तो सिर्फ झाकी है, दिल्ली अभी बाकी है ! सर्वोच्च न्यायालयातील घटना खंडपिठाने मिंधे सरकार विरोधात निकाल दिला तर मिंद्यांचे पानीपत होऊन ‘घर का ना घाटका’ अशी दयनीय स्थिती होईल. अरूणाचल प्रदेश च्या मुख्यमंत्र्यांची 2016 साली जी अवस्था झाली होती, तशीच अवस्था एकनाथ शिंदेची झाल्यावरच हे दुष्टचक्र पूर्ण होईल.
मी नेहमी म्हणत असतो,नियतीच्या न्यायालयात योग्य तो न्याय निवाडा होतो कारण नियती लाच घेत नाही. या न्यायाने शिंदेंच्या अध:पतनास आत्ता सुरूवात झाली आहे,हाच संकेत नियतीने दिला आहे. महाराष्ट्राची 13 कोटी स्वाभिमानी जनता या मिंद्यांचे अध:पतन पाहण्यास डोळ्यात प्राण आणून वाट पाहत आहे.
दिलीप मालवणकर
ज्येष्ठ पत्रकार व शिवसैनिक
9822902470