June 30, 2025 11:17 pm

१५% असलेला व्यक्ती झाला ४०% दिव्यांग जळगाव शा.वै.महाविद्यालयाचा गैरप्रकार

अपनी भाषा में पढ़े! Translate

१५% असलेला व्यक्ती झाला ४०% दिव्यांग जळगाव शा.वै.महाविद्यालयाचा गैरप्रकार

जळगांव-प्रतिनिधी दि. ११ जुलै २०२२ रोजी जळगांव जिल्ह्यातील काही वृत्तपत्रात मुदत संपलेल्या व अपात्र दिव्यांग प्रमाणपत्रावर अनुदान घेत असलेल्या पारोळा तालुक्यातील कंकराज या गावाचा रहिवासी श्री.विश्वास रंगराव पाटील यांना १४ सप्टेंबर २०१८ च्या शासन निर्णयानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव यांनी वैद्यकीय तपासणी करून १५ % दिव्यांगत्वाचा ३ महिने मुदत असलेला दाखला दिला होता. परंतु या व्यक्तीस दिनांक २४ ऑगस्ट २०२२ रोजी ४०% असलेला बनावट दिव्यांगत्वाचा दाखला देण्यात आला असल्याचे समोर आले आहे. एकीकडे दिव्यांगांना अनेक त्रास सहन करत जिल्ह्याच्या ठिकाणी अनेक फेऱ्या माराव्या लागत असतात कायमस्वरूपी दिव्यांग व्यक्तीला तात्पुरते प्रमाणपत्र देण्यात येते. शिवाय टक्केवारी देखील कमी केली जात असल्याची बाब निदर्शनास आली आहे. दि.१९/०४/२०१७ रोजी १५% दिव्यांग असलेल्या व्यक्तीला काही अपंग संघटनेच्या मदतीने दि.२४/०८/२०२२ रोजी ४०% दिव्यांगत्वाचा दाखला देण्यात आला आहे. सदरील प्रकार हा जिल्ह्यात ससून रुग्णालयाप्रमाणेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव यांचा भोंगळपणा तसेच गैरप्रकार लक्षात येत आहे. याबाबत अशा अनेक व्यक्तींना कमी टक्क्यावरून जास्त टक्केवारी चे दिव्यांग प्रमाणपत्र दिले गेले असल्याचा पुरावा काही वृत्तपत्रांच्या हाती लागला आहे. तथापि सदरील प्रमाणपत्राबाबत आरोग्य उपसंचालक नाशिक यांच्याकडे काही वृत्तपत्रे पाठपुरावा करून सत्य जनतेसमोर आणून खऱ्या दिव्यांगांना न्याय मिळवून देणार आहे. काही दिव्यांग संघटनेच्या माध्यमातून असे गैरप्रकार सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगांव या ठिकाणी सुरू आहेत.


यात काही बोगस प्रमाणपत्रावर देखील खरे प्रमाणपत्र दिले असल्याचे समोर आले आहे. आणि सदरील udid कार्ड सध्या काही व्हाट्सअप्प ग्रुप ला देखील व्हायरल होत आहे.
क्रमशः

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!