June 30, 2025 1:56 pm

शिवसेनेत आहे…मरेपर्यंत शिवसेनेतच राहीन-आमदार रविंद्र वायकर

अपनी भाषा में पढ़े! Translate

शिवसेनेत आहे…मरेपर्यंत शिवसेनेतच राहीन

१९७४ साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट झाली, तेव्हापासून शिवसेनेत आहे आणि मरेपर्यंत शिवसेनेतच राहीन, असे शिवसेनेचे आमदार रविंद्र वायकर यांनी विधानसभेत नियम २९२ अन्वये मांडण्यात आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना ठणकावून सांगितले. महाराष्ट्रातील जनतेचे लोकप्रतिनिधींच्या वर्तणुकीकडे बारकाईने लक्ष असते. त्यामुळे लोकप्रतिनिधींकडून चांगल्या वर्तणुकीची अपेक्षा असल्याने प्रतिमा मलिन होणार नाही याची काळजी सर्वच लोकप्रतिनिधींनी घेतली पाहीजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
या प्रस्तावावर बोलताना वायकर यांनी, ज्येष्ठ नागरीकांच्या फसवणुकीच्या वाढत्या घटना, महिलांवरील वाढते अत्याचार, महाराष्ट्रातील पोलिसांच्या घरांचा वाढता प्रश्न, जोगेश्वरीतील मेघवाडी, आरे तसेच जोगेश्वरी पोलिस स्टेशनच्या पुनर्बांधणी प्रलंबित प्रश्‍न, हरीनगर-शिवाजीनगर एस.आर.ए प्रकल्पातील शासनाच्या वाट्यातील १२२ सदनिकांची परस्पर विक्री करून शासनाची करण्यात आलेली फसवणुकीबद्दल, मजासवाडी सर्वोदयनगर पुनर्विकास, पीएमजीपी इमारतीच्या पुनर्वसनाचा प्रश्न, नेस्को येथील प्रदर्शन केंद्रामुळे पश्‍चिम द्रुतगती महामार्ग होणारी वाहतुकीची कोंडी आदी विषयांकडे शासनाचे लक्ष वेधले.

                                                
 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!