20 लाखांचे पॅकेज मिळवण्यात माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थिनीला यश…
बारामती (विशेष प्रतिनिधी-संदिप आढाव)
माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालय हे विद्यार्थ्यांना करिअरसाठी उत्तमोत्तम नोकरीचे पर्याय उपलब्ध करून देण्यामध्ये मागील 32 वर्षांमध्ये दर्जेदार कामगिरी बजावत आहे. महाविद्यालयातील आयटी विभागातील विद्यार्थिनी प्रतिमा कोरे हिला सेल्सफोर्स या कंपनीतर्फे 20 लाखांचे भरघोस पॅकेज देण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एम. मुकणे यांनी दिली.निवडीची प्रक्रिया अँप्टीट्यूड टेस्ट , प्रोग्रामिंग टेस्ट व पर्सनल इंटरव्ह्यू या तीन स्तरांवर मूल्यांकन करून संपन्न झाली होती. यावेळी बोलताना प्रतिमा कोरे हिने आपण उत्कटतेने आणि कठोर परिश्रमाने अधिक गोष्टी करण्याचा जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा चांगल्या गोष्टी घडतात. तसेच सातत्याने अभ्यास व प्रयत्न केल्यास यश नक्की मिळते असे नमुद केले.तसेच माझ्या या यशामध्ये महाविद्यालयातील सर्व शिक्षकांचा व महाविद्यालय शैक्षणिक संस्कृतीचा सिंहाचा वाटा आहे असे सांगितले.कॉलेजमध्ये येणारा प्रत्येक विद्यार्थी भविष्याचे स्वप्न पाहत असतो.ती स्वप्न साकार करत असताना विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यासाचे व वेळेचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.तसेच करिअर घडवण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच व्यक्तिमत्व विकास व प्रभावी संभाषण कौशल्य आत्मसात करावे असे महाविद्यालयाचे ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर डॉ. माधव राऊळ यांनी नमुद केले.प्रतिमा कोरे हिला नोकरीमध्ये मिळालेले भरपूर यश ही बाब महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेवर शिक्कामोर्तब करते असे प्राचार्य डॉ. एस.एम. मुकणे यांनी सांगितले.विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबरच रोजगारक्षम बनवणारे कौशल्य विकसित करण्यासाठी माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये विविध विषयांवर आधारित कार्यशाळांचे तसेच विविध वेबिनार मालिकांचे महाविद्यालयामार्फत वेळोवेळी आयोजन करण्यात येत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना नोकरीच्या विविध संधी तसेच पॅकेज मधील नवीन उच्चांक गाठण्यास मदत होत आहे.तिच्या या यशाबद्दल
शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष व माळेगाव सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे व संचालक मंडळ , विश्वस्त वसंतराव तावरे , अनिल जगताप , रविंद्र थोरात, महेंद्र तावरे, रामदास आटोळे, गणपत देवकाते, सीमा जाधव, चैत्राली गावडे व संस्थेचे सचिव प्रमोद शिंदे यांनी अभिनंदन केले.