भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव ७५ व्या प्रसंगी कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा सत्कार :-युवक काँग्रेस अध्यक्ष श्री मिलिंद साबळे
प्रतिनिधी :- संतोष सोनटक्के
इंदापूर :- इंदापूर तालुक्यातील कर्तव्यदक्ष अधिकारी यांची कामगिरी पाहता इंदापूर तालुका काँग्रेस पक्षाचे युवक अध्यक्ष श्री मिलिंद साबळे यांनी इंदापूरचे नायब तहसीलदार श्री अनिल ठोंबरे साहेब ,पोलीस निरीक्षक श्री टी. वाय. मुजावर साहेब ,सहाय्यक.पोलीस निरीक्षक श्री बिराप्पा लातूरे साहेब , गोपनीय विभाग अधिकारी श्री विनोद पवार साहेब , यांनी तालुक्यात कर्तव्यदक्ष कामगिरी केल्याबद्दल युवक अध्यक्ष श्री मिलिंद साबळे , इंदापूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष श्री सुफियान जमादार , युवा नेते श्री संदीप राजे भोसले ,श्री वैभव साबळे साहेब ,श्री गणेश ढोबळे ,श्री अनिकेत जाधव व इतर मान्यवरांनी त्यांचा सत्कार केला उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पुष्पगुच्छ , राष्ट्रध्वज व मिठाईचे वाटप केले.

या प्रसंगी बोलताना देशाच्या स्वातंत्रता आज 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. देशाच्या प्रत्येक नागरिकांसाठी
हा आनंदाचा क्षण आहे. असे उद्गार श्री बिराप्पा लातुरे साहेबांनी केली.
तर देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्याग , समर्पण आणि बलिदान देऊन मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी ज्या क्रांतिकारकांनी बलिदान दिले. त्यांना अभिवादन करून विविध भाषा , बोली , संस्कृती आणि परंपरेने नटलेल्या आपल्या भारत देशाची लोकशाही टिकून राहो , स्वातंत्र्य , समता , बंधुभाव ही मूल्य कायम अबाधित राबत असे उद्गार अध्यक्ष श्री मिलिंद साबळे यांनी केले.
