July 1, 2025 7:24 am

हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत महाराणी येसूबाई महिला बचत गट पुरविणार तिरंगा

अपनी भाषा में पढ़े! Translate

हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत महाराणी येसूबाई महिला बचत गट पुरविणार तिरंगा

अमळनेर(प्रतिनिधी) येथील राजमुद्रा फाउंडेशन संचलित महाराणी येसूबाई महिला बचत गटातर्फे ” हर घर तिरंगा ” मोहिमे अंतर्गत तिरंगा ध्वज अल्पदरात पुरविला जाणार आहे.
भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याने केंद्र शासनातर्फे या वर्षी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यात १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज डौलाने फडकणार आहे. याचाच भाग म्हणून शहरातील महाराणी येसूबाई महिला बचतगटातर्फे तिरंगा ध्वज बनविण्याचे काम हाती घेण्यात आले असून , शहरातील नागरिकांना अल्पदरात हे ध्वज पुरविण्यात येणार असून नगरसेवक शाम पाटील यांच्या फोर्ट्स कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन राजमुद्रा फाउंडेशनचे अध्यक्ष शाम पाटील यांनी केले आहे.
ध्वज तयार करण्याचे काम मागील काही दिवसांपासून सुरू असून यात बचत गटातील जयमाला सुधीर बेहरे , आरती श्याम पाटील , लिना किरण पाटील , हर्षदा आशिष पाटील , वैशाली संजय मोरे , रत्नप्रभा अनिल बोरसे , वैशाली चद्रकांत वाघ , भारती दयाराम पाटील , शालीनी सुनील शिशोदे , रोशनी सुनील बोरसे , संगिता पाटील, सुनिता बोरसे यांचे प्रयत्न आहे..

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!