June 30, 2025 4:37 pm

आमदार भरणेंकडून शहा कुटुंबीयांचं सांत्वन..

अपनी भाषा में पढ़े! Translate

आमदार भरणेंकडून शहा कुटुंबीयांचं सांत्वन..

इंदापूर प्रतिनिधी – आदित्य बोराटे

इंदापूर शहरातील नामांकित कापड व्यापारी व शहा ब्रदर्सचे मालक इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शेठ शहा यांच्या मातोश्री व गोकुळदास शेठ शहा यांच्या पत्नी कै.शकुंतला (भाभी) शहा (वय ८२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्या अकलूज येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली. यानंतर गुरवारी दि.४ ऑगस्ट रोजी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी शहा कुटुंबियांची इंदापूर येथील निवासस्थानी जाऊन शहा कुटुंबाचे सांत्वन केले.भरणे यांनी शकुंतला (भाभी) शहा यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

       

यावेळी इंदापूर राष्ट्रवादीचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे,इंदापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब ढवळे,नगरसेवक पोपट शिंदे,अमर गाडे,दिलीप वाघमारे,सागर पवार,प्रमोद राऊत,सचिन देवकर आदी उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!