June 30, 2025 11:21 pm

श्रावण मासानिमित्त मंगळग्रह मंदिरात लघुरुद्र

अपनी भाषा में पढ़े! Translate

सपत्नीक लघुरुद्र महापूजा करताना ऍड. केतन ढाके व ऍड. दिलीप मंडोरे.

अमळनेर- येथील मंगळग्रह देव मंदिराच्या परंपरे प्रमाणे पहिल्या श्रावण सोमवारी अर्थात एक ऑगस्ट श्री लघुरुद्र महापूजा झाली.
जळगाव जिल्हा वकील संघाचे नवनियुक्त अध्यक्ष व जिल्हा सरकारी वकील अॅड. केतन ढाके व ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. दिलीप मंडोरे हे सपत्नीक पूजेचे मानकरी होते. मुख्य पुरोहित केशव पुराणिक होते. त्यांना सुनील मांडे, सारंग पाठक, प्रसाद भंडारी, जयेंद्र वैद्य, गणेश जोशी, अक्षय जोशी, मेहुल कुलकर्णी, व्यंकटेश कळवे, मयूर राव, मिलिंद उपासनी यांनी सहकार्य केले.
लघुरुद्र महापूजा अभिषेकानंतर विशेष महाआरती झाली. यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे सर्व विश्वस्त मंडळ, सेवेकरी ,भाविक व वकील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!