June 30, 2025 12:26 pm

सीना कालव्यावरील 70 किमी रस्त्याचे आ.रोहित पवार करणार मजबुतीकरण; आ. रोहित पवारांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न!

अपनी भाषा में पढ़े! Translate

सीना कालव्यावरील 70 किमी रस्त्याचे आ.रोहित पवार करणार मजबुतीकरण; आ. रोहित पवारांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न!

30 वर्षांत पहिल्यांदाच आ. रोहित पवारांच्या माध्यमातून सीना कालव्यातील गाळ काढण्यात आला
प्रतिनिधी.संदिप कायगुडे
कर्जत | कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून सीना कालव्या शेजारील असलेल्या एकूण 70 किमी रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम करण्यात येणार आहे. कर्जत तालुक्यातील नागलवाडी येथे सीना कालव्यावरील रस्त्याच्या कामाचे उद्घाटन आमदार रोहित पवार यांच्या हस्ते नुकतेच पार पडले आहे.

आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून सीना कालव्यात असलेला 70 ते 72 किलोमीटर साठलेला गाळ मागच्या 30 वर्षात पहिल्यांदाच काढून महत्त्वाचे म्हणजे 15 किलोमीटरचा डीपकट असलेल्या ठिकाणी लॉन्ग बोंब मशीनने तो पॅच पूर्ण करून आणत त्यामुळे पाण्याला येणारा अडथळा कमी होऊन 70 ते 73 किलोमीटरचा टेलचा जो भाग आहे. त्या ठिकाणी 73 किलोमीटरपर्यंत सध्या आमदार रोहित पवार यांच्या नियोजनामुळे पाणी पोहोचत आहे. तसेच सीना कालव्यावर एकूण 150 गेट देखील बसवण्यात येणार असून त्यापैकी 50 गेट बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर उर्वरित 100 गेट बसवण्याचे काम सुद्धा सुरू आहे. हे सर्व करत असताना जर या कॅनलवरचा रस्ता आपण करू शकलो तर हजारो लोकांना याचा फायदा होईल, या हेतूने सीना कालव्यावरील रस्त्याचे काम रोहितदादांच्या माध्यमातून हाती घेण्यात आले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून सीना कालव्याशेजारील रस्ता हा झाडाझुडपांनी वेढलेला पाहायला मिळत होता. त्याचबरोबर यामुळे परिसरातील नागरिक, शेतकरी व शाळकरी मुले यांना रस्त्याअभावी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. हा नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन आमदार रोहित पवार यांनी सीना कालव्याशेजारील रस्ता मजबुतीकरणाचे काम हाती घेतले आहे. एकूण 70 किलोमीटर असणारा हा रस्ता पूर्णपणे झाडाझुडपांनी वेढलेला होता. अलीकडेच झाडेझुडपे पूर्णपणे हटवण्यात आली असून हा रस्ता आता मोकळा करण्यात आला आहे आणि आता या रस्त्याच्या मजबुतीकरणाच्या कामाचे उद्घाटन पार पडले.

या रस्त्याच्या कामामुळे निमगाव गांगर्डा, घुमरी, बेलगाव, कोकणगाव, मिरजगाव, रातंजन, नागलवाडी, नागापूर, गंगेवाडी, माही, जळगाव, पाटेगाव, नवसरवाडी, आनंदवाडी, निमगाव डाकू व पाटेवाडी या परिसरातील नागरिक व शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी फायदा होणार आहे. तसेच शेताकडे जाण्यासाठी मजबूत व चांगला रस्ता झाल्याने शेती मालाची वाहतूक करण्यासाठी व शेताकडे ये-जा करण्यासाठी देखील याची मदत होणार आहे. मतदारसंघातील छोट्या छोट्या अडचणींकडे आमदार रोहित पवार यांचे वैयक्तिक पातळीवर लक्ष असते. त्यामुळेच कर्जत-जामखेड तालुक्यातील अनेक प्रलंबित विकास कामे गेल्या अडीच वर्षांत आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून मार्गी लागल्याचे दिसून येत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!