June 30, 2025 9:14 am

सार्वजनिक उत्सवांत वारंवार गुन्हे करणाऱ्या आरोपीस पुन्हा एकदा ‘प्रवेशबंदी’

अपनी भाषा में पढ़े! Translate

सार्वजनिक उत्सवांत वारंवार गुन्हे करणाऱ्या आरोपीस पुन्हा एकदा ‘प्रवेशबंदी’

सद्गुरू गोदड महाराज यात्रोत्सवाच्या अनुषंगाने कर्जत पोलिसांची प्रतिबंधक कारवाई
प्रतिनिधी.संदिप कायगुडे
कर्जत दि.२१ तालुक्यातील अनेक सार्वजनिक कार्यक्रमात सतत गोंधळ घालून समाजाच्या धार्मिक भावना दुखावतील असे वर्तन करणाऱ्या आणि कर्जत पोलिसांत विविध प्रकारचे गुन्हे दाखल असलेल्या कर्जत मधील एकावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली आहे.
स्वप्नील उर्फ सनी राजेंद्र पवार (रा.कर्जत) असे तालुक्याच्या स्थळ सिमेच्या हद्दीत प्रवेशबंदी करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. संबंधित आरोपीने राशीन येथे सार्वजनिक शिवजयंती मिरवणुक सुरू असताना एका इसमास मारहाण करून दुखापत केली होती.तर दि.१४ एप्रिल २०२२ रोजीही आरोपीने कर्जत शहरात डॉ. बाबसाहेब आंबेडकरांची जयंती मिरवणुक सुरू असताना सदर ठिकाणी वाद झाल्यानंतर त्याने तिथेही एकास मारहाण केली होती. राशीन घटनेच्या अनुषंगाने आरोपीवर भादवी कलम ३२३,३२४,५०४,५०६ अन्वये गुन्हाही दाखल आहे.संबंधित आरोपी हा उत्सवांमध्ये सतत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतो.त्यामुळे ही गंभीर बाब लक्षात घेऊन कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आरोपीस दोनA महिन्याच्या कालावधीकरता कर्जत तालुक्याच्या हद्दीत प्रवेश बंदीबाबत आदेश करण्याची विनंती उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे केली होती.त्याअनुषंगाने आरोपीस एक महिना कर्जत तालुक्याच्या स्थळसिमा हद्दीत प्रवेश करण्यास बंदी घातल्याचा आदेश दिला होता.मात्र प्रतिबंध कालावधी संपताच त्याने दि.३ सप्टेंबर रोजी एक युवकास वनविभागाच्या कार्यालयाजवळून जात असताना ‘तू माझ्याकडे का बघतो? असे बोलून शिवीगाळ व लथाबुक्क्यांनी मारून त्याच्या डोक्यात वीट मारली.हा वाद दोन्ही समाजात तेढ निर्माण करणारा ठरू शकत होता. या बाबींचा विचार करता आरोपीवर दुसऱ्यांदा क्रिमिनल प्रोसिजर कोड(सीआरपीसी) कलम१४४(२)प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.

     

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री मनोज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव उपनिरीक्षक अमरजीत मोरे पोलीस हवालदार सलीम शेख उद्घाव दिंडे यांनी केली आहे.

‘त्या’ आरोपीस दुसऱ्यांदा तालुका प्रवेश बंदी!
दि.२४ व २५ जुलै रोजी गोदड महाराजांची यात्रा आहे.संबंधित आरोपी हा खोडसर असल्याने तो पुन्हा वाद-विवाद घडवुन आणू शकतो त्यामुळे पोलीस निरीक्षक यादव यांनी दि.१५ जुलै ते १६ ऑगस्ट या एक महिन्याच्या कालावधीकरता कर्जत प्रवेश बंदीबाबत उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना विंनती केली होती.त्या अनुषंगाने उपविभागीय दंडाधिकारी अजित थोरबोले यांनी दि.१५ जुलै रोजी हा आदेश दिला आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!