June 30, 2025 11:14 pm

इंदापूर चे माजी नगरसेवक शेखर पाटील यांच्या वतीने वारकऱ्यांना फराळ वाटप

अपनी भाषा में पढ़े! Translate

इंदापूर चे माजी नगरसेवक शेखर पाटील यांच्या वतीने वारकऱ्यांना फराळ वाटप
तक्रारवाडी प्रतिनिधी श्री युवराज काळंगे दिं२-७-२०२२
खांद्यावर पताका, हातात चिपळ्या, टाळ वीणा डोक्याला उभा गंध लावलेले वारकरी तसेच डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिलांनी केलेल्या विठू नामाच्या गजराने आज इंदापूर शहर दुमदुमले.
दोन दिवसासाठी मुक्कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंड्यानी इंदापुरातील सर्वच रस्ते गल्लीबोळा गजबजलेल्या आहेत.
या वातावरणाने अवघे पंढरपूर अवतरलेल्याचा प्रत्यय इंदापूरकरांना आला भक्ती सोहळा आणि भाविकांचा महासागर पाहून संतांनी वर्णन केलेल्या स्वर्गीच्या सुखाचीच अनुभूती भाविकांना आली.
पालखी सोहळा इंदापूर दाखल होताच इंदापूर नगरपालिकेचे मा नगरसेवक व भारतीय जनता पक्षाचे युवा नेते शेखर पाटील यांनी येणाऱ्या वारकरी व विठ्ठल भक्तांसाठी न्याहारीची उत्तम सोय केली.
यावेळी उपस्थित राहात हजारो वारकऱ्यांनी फराळ नाष्टा व चहाचा आस्वाद घेतला यावेळी स्वर्गीय मंगेश बाबा पाटील प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी यांनी उपक्रमांचे आयोजन केले होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!