June 30, 2025 11:50 am

शेटफळगडे ग्रामपंचायत सरपंचपदी सौ.शितल धुमाळ तर उपसरपंच पदी श्री.अंबादास भोसले यांची बिनविरोध निवड..

अपनी भाषा में पढ़े! Translate

शेटफळगडे ग्रामपंचायत सरपंचपदी सौ.शितल धुमाळ तर उपसरपंच पदी श्री.अंबादास भोसले यांची बिनविरोध निवड..
प्रतिनिधी – प्रा. तुषार वाबळे
शेटफळगडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शितल धुमाळ यांची तर उपसरपंच पदी अंबादास भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी मावळत्या सरपंच सौ रूपाली वाबळे आणि उपसरपंच यांनी राजीनामा दिल्याने सरपंचपद व उपसरपंच रिक्त होते .गुरुवारी ग्रामपंचायत कार्यालय शेटफळगडे येथे ही निवडणूक श्री. कोकरे यांच्या उपस्थितीत ही पार पडली. सरपंचपदासाठी ग्रामपंचायत सदस्य सौ.शितल धुमाळ आणि उपसरपंचपदी अंबादास भोसले यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी व उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केले. यावेळी ग्रामविकास अधिकारी पवार यांनी सहाय्यक म्हणून काम पाहिले. त्यांच्या निवडीचे लामजेवाडी व शेटफळगडे गावातील सर्व घटकांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत येणारी विकास कामे, रस्ते, पिण्याचे पाणी ही कामे तातडीने करावी अशी आशा गावातील सर्व नागरिकानी केली आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य राहुल वाबळे, ज्ञानेश्वर वाबळे ,अर्चना कुंभार , पल्लवी भोसले ,शंकर राऊत, विद्या सवाने, जयश्री झगडे , माजी सरपंच शंकर वाबळे, कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूरचे संचालक संतोष वाबळे, अजित कुंभार मा. तंटामुक्ती अध्यक्ष रामदास कदम, अशोक जगताप उपसरपंच अण्णासाहेब सिरसट, माजी उपसपंच अनिल वाबळे महादेव सुर्यवंशी, पोलीस पाटील रखमाजी सावाने, भिगवण पोलिस स्टेशनचे श्री जाधवसाहेब तसेच आजी-माजी पदाधिकारी शेटफळगडे लामजेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी सर्वांनी शुभेच्छा दिल्या.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!