July 1, 2025 12:29 pm

अवैध दारू प्रतिबंधात्मक माळशिरस तालुका सदस्य पदी नितीन वाघमारे यांची नियुक्ती

अपनी भाषा में पढ़े! Translate

अवैध दारू प्रतिबंधात्मक माळशिरस तालुका सदस्य पदी नितीन वाघमारे यांची नियुक्ती

पंढरपूर प्रतिनिधी गणेश ननवरे

सोलापूर जिल्हा पालकमंत्री दत्ता भरणे यांचे शिफारशीनुसार माळशिरस तालुका शिवसेना उपप्रमुख नितीन विश्वंभर वाघमारे यांची माळशिरस तालुका अवैध दारू प्रतिबंधात्मक तालुका स्तरीय समिती सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे नितीन वाघमारे हे शिवसेनेचे कट्टर समर्थक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात अतिशय धाडसी आक्रमक चेहरा असलेले वाघमारे यांनी स्वर्गीय लोकनेते दत्ता वाघमारे यांचे नेतृत्वाखाली शिवसैनिक म्हणून श्रीपूर भागात काम सुरू केले सतत सामाजिक राजकीय पार्श्वभूमी वर त्यांनी आपले कार्य सुरू ठेवले आहे अन्याय अत्याचार किंवा विशिष्ट प्रकारचे दहशती विरोधात त्यांनी आवाज उठवला आहे त्यांची शासकीय पातळीवरून सदस्य म्हणून नियुक्ती केल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे की महाळुंग श्रीपूर नगरपंचायत चे माध्यमातून गावांसाठी निश्चित चांगले काम करु आमचें पक्षाचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सहकार्याने गावांसाठी गावाच्या विकासासाठी कल्याणकारी योजना राबवण्यासाठी मोठा विकास निधी उपलब्ध करुन काम करण्यासाठी मी प्रामाणिकपणे कार्यरत राहिन कुठलाही पक्ष गटबाजी किंवा स्थानिक राजकारण न करता सर्वांनी पाठिंबा सहकार्य केले तर अनेक विकासकामे करण्यासाठी भरीव निधी आणता येईल पुढे माहिती देताना त्यांनी सांगितले की या परिसरातील सर्व अवैध धंदे बंद करून युवा पिढीला चांगल्या प्रवाहात कसं आणता येईल तसेच त्यांना रोजगाराच्या संधी व्यापार धंदा करण्यासाठी शासकीय पातळीवरून समाजकल्याण अधिकारी यांच्या सहकार्याने बेरोजगार मेळावा रोजगार धंदा वाढवण्यासाठी कोणती योजना आहे याची माहिती देण्यासाठी दर महिन्याला मेळावा घेऊन समुपदेशन कार्यक्रम घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारं आहे वाघमारे यांनी शिवसेनेच्या वतीने महाळुंग श्रीपूर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक लढवली होती गावाच्या विकासासाठी चांगलं काम करुन दाखवणार अशी त्यांनी ग्वाही दिली आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!