मालपूर येथील तरूण भास्कर कोळी यांचा मोटरसाइकल अपघातात मृत्यू…
प्रतिनिधी रविता कुंभार
दोंडाईचा- मालपूर ता.शिंदखेडा येथील व्यवसायाने मिस्तरी काम करणारे भास्कर ओंकार कोळी (वय-३९) हे आपली भाची सुन व अडीच वर्षाचा नातु यांना सोडायला उंटावद-शिरपुर ह्या गावी जात असताना दोंडाईचा येथील शिंदखेडा रस्त्यावर उड्डाण पुलाचे काम सुरू असलेल्या पिल्लरला मोटर सायकल क्रमांक एम.एच.१८-बी.के-००६९ ची जोरदार धडक दिल्याने मोटर सायकल चालक भास्कर कोळी यांचा जागीच मुत्यू झाला तर अन्य दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
याबाबबत मिळालेली माहिती अशी की,आज दिनांक २ जुन गुरूवार रोजी दुपारी मालपुर येथील व्यवसायाने मिस्तरी असलेले भास्कर ओंकार कोळी हे दीड वाजता आपली भाची सुन व अडीच वर्षाचा नातु यांना उंटावद-शिरपुर येथे माहेरी सोडायला निघाले असता.दोंडाईचा जवळ शिंदखेडा कडे जाणाऱ्या जुन्या रेल्वे गेटजवळ उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू आहे. त्याठिकाणीं कच्च्या रस्त्यावरून जाताना रहदारीचा जास्त गर्दी असते तरी तेथे लवकरच रस्ता निर्माण करावा.