करमाळा प्रतिनिधी :- करमाळा तालुक्यामध्ये शिवसेना पक्षाचे कार्य अत्यंत तळमळीने करून पक्षवाढीसाठी प्रामाणिकपणे कार्य करीत असलेल्या प्रियांका सागर गायकवाड यांची पुन:श्च करमाळा शिवसेना महिला तालुका प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सदरची नियुक्ती शिवसेना प्रवक्त्या तथा सोलापूर महिला संपर्क प्रमुख संजनाताई घाडी यांच्या हस्ते मुंबई येथे करण्यात आली.
यावेळी संपर्कप्रमुख घाडी यांनी गायकवाड यांना नियुक्ती पत्र देताना सांगितले की, पक्षवाढी साठी आपण ज्या पद्धतीने कार्य करीत आहात ते कौतुकास्पद आहे. तसेच पक्षाचे विविध आंदोलने, बैठका, कार्यक्रम इत्यादी मध्ये आपला सक्रिय सहभाग दिसत आल्याने व पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहचून पक्षाची ध्येयधोरणे राबविण्यासाठी यशस्वी प्रयत्न केल्याने आपली पुन:श्च करमाळा शिवसेना महिला तालुका प्रमुख पदी नियुक्ती केली आहे.
यावेळी नियुक्ती नंतर गायकवाड यांनी सांगितले की, हिंदुरुदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार व पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशप्रमाणे व शिवसेना उपनेत्या मीनाताई कांबळी, सोलापूर महिला संपर्क प्रमुख संजनाताई घाडी यांच्या सूचनेनुसार करमाळा तालुक्यातील विविध घटकांना सोबत घेऊन निष्ठावान शिवसैनिकांना न्याय देण्याचे कार्य करून आपण दिलेली जबबदारी सार्थ पणे पार पाडू तसेच लवकरच गाव तेथे शाखा, घर तेथे शिवसैनिक निर्माण करण्यासाठी कामाला लागणार असून करमाळा तालुक्यातील आगामी सर्व निवडणुकात शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी महीला आघाडी सक्षमपणे आपले कर्तव्य पार पाडणार असल्याचे प्रतिपादन यावेळी गायकवाड यांनी केले.
गायकवाड यांच्या नियुक्तीनंतर करमाळा तालुक्यातील शिवसैनकांमध्ये सर्वत्र आनंदाचे वातावरण असून शिवसेना माजी आमदार नारायण पाटील, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका तथा आदिनाथ कारखान्याच्या माजी चेअरमन रश्मी बागल, युवा नेते पृथ्वीराज पाटील, मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल, शिवसेना उपजिल्हा प्रमूख महेश चिवटे, शहर उपप्रमुख पंकज परदेशी, महिला उपजिल्हा प्रमुख आशा टोणपे, शिवसेना तालुका उपप्रमुख बंडू शिंदे, युवा सेना उपजिल्हा प्रमुख मयूर यादव, शिवसेना माजी शहर प्रमुख संजय शिलवंत, युवा सेना शहर प्रमुख विशाल गायकवाड, युवा सेनेचे राहुल कानगुडे, तालुका उपप्रमुख दादासाहेब तनपुरे, उपशहर प्रमुख प्रसाद निंबाळकर, अविनाश भिसे आदी शिवसेना व युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गायकवाड यांना शुभेच्छा दिल्या.