कोरोना रुग्णांमध्ये संथपणे वाढ दिसत असून राज्यातल्या जनतेला मास्क वापरण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन
प्रतिनिधी-अर्जुन आहेर
कोरोना रुग्णांमध्ये संथपणे वाढ दिसत असून राज्यातल्या जनतेनं मास्क वापरत रहावं, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या माध्यमातून जनतेला केलं आहे. राज्याची साप्ताहिक पॉझिटीव्हीटी १ पूर्णांक ५९ शतांश टक्के असून मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त पॉझिटीव्हीटी आढळते. मुंबईत रुग्णसंख्येत ५२ पूर्णांक ७९ शतांश टक्के वाढ झाली असून, ठाण्यात २७ पूर्णांक ९२ शतांश टक्के आहे.
सध्या केवळ एक रुग्ण व्हेटिलेटरवर असून १८ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या कमी असली तरी कोरोना पूर्णपणे गेलेला नाही हे लक्षात घेऊन सर्वांनी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. सध्या १८ पेक्षा अधिक वयाच्या ९२ पूर्णांक २७ शतांश टक्के लोकांना लशीची किमान एक मात्रा दिली आहे आहे. चाचण्यांचे प्रमाण कमी झाले आहे, ते वाढवण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.