भैरवनाथ विद्यालयाचा 2021 च्या शासकीय चित्रकला एलिमेंट्री व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा निकाल 100%.
प्रतिनिधी: – प्रा तुषार वाबळे
रयत शिक्षण संस्थेचे ,भिगवण येथील भैरवनाथ विद्यालयाने याही वर्षी चित्रकला परीक्षा केंद्र श्री बाबिर विद्यालय, रुई या ठिकाणी घेण्यात आलेल्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे .त्यामध्ये , भैरवनाथ विद्यालय भिगवण येथील इंटरमिजिएट 2021 परीक्षेमध्ये ए ग्रेड मिळवून कुमारी घाडगे सानिका शिवाजी, कु.जगताप सुप्रिया किशोर, कु. खरात तेजश्री आण्णासो तसेच बी ग्रेड मिळवून कु.रांधवण सिद्धी संजय , कु. हगारे प्रांजली संजय व व इतर सर्व परीक्षार्थींनी सी ग्रेड मिळवून यश संपादन केले आहे .तसेच एलिमेंट्री 2021परीक्षेमध्ये बी ग्रेड मिळवून कोकणी भावेश किरण कुमार, जाधव प्रज्योत नानासाहेब व इतर सर्व परीक्षार्थींनी सी ग्रेड मिळवून यश संपादन केले आहे. यामुळे सर्व सहभागी यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे चित्रकला शिक्षक , परीक्षा विभाग प्रमुख राऊत डी.एस. (कलाशिक्षक) व सर्व शिक्षक वृंद यांचे विद्यालयाच्या वतीने स्थानिक स्कूल कमिटी,तसेच विद्यालयाचे पर्यवेक्षक काकडे डी.जी. व मुख्याध्यापक श्री गावडे एस.एम.यांनी अभिनंदन केले आहे. यामुळे पुन्हा एकदा विद्यालयाची गुणवत्ता आणि निकालाची परंपरा राखण्यात विद्यालयाने यशस्वीते कडची वाटचाल चालू ठेवली आहे.