करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- महाराष्ट्र राज्य उप मुख्यमंत्री मा ना.अजित दादा पवार व खा.सुप्रिया ताई सुळे यांच्या हस्ते दिले निवडीचे पत्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाईट काळात पक्षाला सोडचिठ्ठी देऊन अनेक नेते कार्यकर्ते इतर पक्षात प्रवेश करत होते आशातच करमाळा तालुका मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा ज्यांच्या खांद्यावर होती अशा बागल गटाने देखील पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिवबंधन बांधले होते त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था हि करमाळा तालुका मध्ये अत्यंत दैनी झाली होती अशा परिस्थितीत मध्ये हनुमंत मांढरे-पाटील यांनी पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या वरती आसलेले प्रेम आणि पक्षा वरची निष्ठा कायम ठेवली व इतर कार्यकर्ते सोबत पक्षाचे काम जोमाने चालू ठेवले आशा परिस्थिती मध्ये अपक्ष आमदार संजय मामा शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून झाला आणि आसा आदेश तालुका अध्यक्ष मांढरे-पाटील यांच्या कडे आला त्यावेळी त्यांनी सोबत आसणारे कार्यकर्ते व पदाधिकारी यांना आपल्याला पक्ष आदेश पाळायचा आहे सांगून आपल्याला अपक्ष आमदार संजय मामा शिंदे यांचा प्रचार करून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून आणायचं आहे त्या वेळी त्यांनी निष्ठेने आमदार संजय मामा शिंदे यांचे काम केले आणि संजय मामा शिंदे हे निवडून आले परंतु विधानसभा झाल्यावर पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिवबंधन बांधणारे परत पक्षा प्रती प्रेम व निष्ठा दाखवू लागले त्याच वेळी सोलापूर जिल्हा परिषद जिल्हा अध्यक्ष निवडी ची प्रक्रिया सुरू झाली त्या मुळे काही कारणास्तव मांढरे-पाटील यांना तालुका अध्यक्ष पदावरून पायउतार व्हावे लागले परंतु मांढरे-पाटील यांनी पक्षा वरती कोणती हि नाराजी व्यक्त न करता पक्ष देइल ती जबाबदारी खंबीर पणे पार पाडत तालुका कार्याध्यक्ष या पदावरती निष्ठेने काम केले आणि त्यांची पक्ष निष्ठ व काम करण्याची पध्दत सगळ्या गोष्टी बघता आज पुन्हा एकदा मांढरे-पाटील यांच्या वरती राष्ट्रवादी काँग्रेस करमाळा तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी जिल्हा अध्यक्ष बळीराम काका साठे यांना वरिष्ठ पातळीवरून देण्याचे सागून आज जिल्हा अध्यक्ष यांनी हि जबाबदारी पुन्हा एकदा मांढरे-पाटील यांच्या कडे सोपवली आहे त्या वेळी मा.ना अजित दादा पवार यांनी शुभेच्छा दिल्या.
