June 30, 2025 2:20 pm

मदनवाडी गाव कधी होणार टँकर मुक्त;पाणी उशाला कोरड घश्याला

अपनी भाषा में पढ़े! Translate

मदनवाडी गाव कधी होणार टँकर मुक्त;पाणी उशाला कोरड घश्याला

(निलेश गायकवाड )

मदनवाडी गावाने आतापर्यंत सर्वाधिक मोठं मोठे पदे आपल्या पदरात पाडली आहेत. तालुका, जिल्हा, प्रदेश विविध पदावर किव्हा पंचायत समिती, जिल्हा परिषद अश्या विविध पदावर गावातील नेत्यांनी काम केले असून देखील पिण्याच्या किव्हा वापरायच्या पाण्याचा प्रश्न काही सुटला नाही. गावच्या कडेला पाणीच पाणी उजनी पाणलोट क्षेत्र उशाला असून पाण्याच्या अनेक योजना राबविण्यात आल्या तरीही गावाला पाण्याची बारमाही टंचाई पूजलेलीच.

मदनवाडी गावाने वेळोवळी प्रत्येक पुढऱ्याला प्रत्येक इलेक्शनला मतदान रुपी साथ दिली.वर्षानुवर्षे पुढऱ्याने मात्र खोटी आश्वासन देऊन नागरिकांची दिशाभूल केली आहे.आज पाणी हेच सर्वस्व आहे पाणी नसेल तर जाणजीवन विस्कळीत होते.असे असले तरी गावाच्या पाण्याच्या विषयाकडे कोणताच पुढारी किव्हा ग्रामपंचायत ग्रामसेवक गांभीर्याने घेताना दिसत नाही. शासन पाण्यासाठी लाखो रुपये खर्च करत आहे तरी देखील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी कोणत्याही हालचाली होत नाही. तात्पुरता प्रमाणात कामे केली गेली असल्याचे दाखवले जाते महिन्यातून 3 ते 4 वेळा पाणी सोडायचे आणि पुन्हा जैसे ते. नागरिकांनी पाण्यासाठी गावातील पुढऱ्यांच्या हातापाया पढायचे विनवणी करायची आणि पुढारी मात्र खोटी आश्वासने देऊन पसार..या गंभीर समस्यांकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी ग्रामस् थांमधून होत आहे.

ग्रामसेवकांची टोलवाटोलवी ची उत्तरे देऊन दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे.2 -2 दिवस ग्रामसेवक ग्रामपंचायत मध्ये उपस्थितीत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहे.परिणामी गावात पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही. अनेक वेळा ग्रामपंचायतकडून पाइप लाइन दुरुस्ती करण्यात आली; मात्र ही समस्या कायमच दिसून येत आहे. सध्या उन्हाचा पारा वाढला असून, पाण्याचा वापर जास्त प्रमाणात होत आहे. त्यामुळे गावात पाणी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा नियोजन नसल्याने नागरिकांना पिण्याचे तर पाणी मिळत नाहीच पण वापरायचे सुद्धा नाही त्यामुळे नागरिक खाजगी टँकर घेऊन आपली पाण्याची वेवस्था करत आहे. वेळोवेळी तांत्रिक अडचणी सोडल्या तर पाणी पुरवठा सुरळीत होत नाही. वर्षानुवर्षे हेच चित्र दिसत आहे.त्यामुळे गाव योजनेचे पाणीपुरवठा लवकर सुरु करण्यात यावा, अशी मागणी मदनवाडी ग्रामस्थांमधून करण्यात आली आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!