June 30, 2025 1:05 am

अनेर मध्यम प्रकल्प अंतर्गत 10 व 14 नंबर चारीच्या लाभार्थ्यांनी आर्थिक मोबदला मिळण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयात तातडीने कागदपत्रे जमा करावे – आ. अमरिशभाई पटेल व आ. काशिराम पावरा यांचे आवाहन

अपनी भाषा में पढ़े! Translate

अनेर मध्यम प्रकल्प अंतर्गत 10 व 14 नंबर चारीच्या लाभार्थ्यांनी आर्थिक मोबदला मिळण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयात तातडीने कागदपत्रे जमा करावे
– आ. अमरिशभाई पटेल व आ. काशिराम पावरा यांचे आवाहन
 
शिरपूर : अनेर मध्यम प्रकल्प अंतर्गत 10 व 14 नंबर चारीच्या लाभार्थी शेतकरी बांधव यांनी भू-संपादित जमिनीचा आर्थिक मोबदला मिळण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयात तातडीने कागदपत्रे जमा करावे असे आवाहन आ. अमरिशभाई पटेल व आ. काशिराम पावरा यांनी केले आहे.
माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल,  आ. काशिराम पावरा व प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणी चेअरमन भूपेशभाई पटेल यांनी सातत्याने पाठपुरावा करून शेतकरी बांधवांच्या अनेर मध्यम प्रकल्प अंतर्गत अनेर वाढीव कालवा वितरिका क्रमांक 10 तसेच 14 च्या जमिनीचा मोबदला मिळावा म्हणून प्रयत्नशील होते. त्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या महिन्यात मोर्चा देखील काढण्यात आला होता. त्याचा परिणाम म्हणून शेतकरी बांधवांच्या 10 नंबर चारीच्या जमिनीचा 1.45 कोटी रुपयांचा मोबदला दि. 8 एप्रिल रोजी तसेच 14 नंबर चारीचा 2 कोटी 69 लाख 80 हजार 431 रुपयांचा मोबदला दि. 26 एप्रिल रोजी आमदार कार्यालयात सुपूर्द करण्यात येऊन प्रांताधिकारी कार्यालयात जमा करण्यात आला होता.
आ. काशिराम पावरा यांनी सोमवारी दि. 9 मे 2022 रोजी प्रांताधिकारी प्रमोद भामरे यांच्या कार्यालयात बैठक घेतली. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील, ॲड. बाबा पाटील उपस्थित होते.
या बैठकीत संबंधीत लाभार्थी शेतकरी बांधवांना त्यांचा आर्थिक मोबदला लवकर मिळावा तसेच शेतकऱ्यांना अनेर धरणाचे पाणी मिळणे खूपच गरजेचे असून अनेरचे पाणी शेतकऱ्यांसाठी सोडण्यात यावे यासाठी बैठकीत आ. काशिराम पावरा यांनी आग्रही मागणी केली. संबंधीत शेतकरी बांधवांना प्रांताधिकारी कार्यालयाने कागदपत्रे जमा करण्याबाबत अनेक दिवसांपूर्वी नोटीस देखील दिल्या आहेत. परंतु, अनेक शेतकरी बांधवांनी अद्यापपावेतो आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही. ती कागदपत्रे 11 मे 2022 पर्यंत लवकरात लवकर जमा करावे असे आवाहन आ. अमरिशभाई पटेल व भूपेशभाई पटेल यांनी केले आहे.
आ. अमरिशभाई पटेल, आ. काशिराम पावरा, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या प्रयत्नाने शेतकऱ्यांच्या हातात 10 वंबर व 14 नंबर चारीचा पैसा मिळणार असल्याने शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे.
शेतकरी बांधवांसाठी 10 नंबर चारीच्या जमिन भू-संपादनाचा 1.45 कोटी रुपयांचा मोबदला व 14 नंबर चारीसाठी 2.69 कोटी रुपयांचा धनादेश प्राप्त झाला असून शेतकऱ्यांनी लवकरच कागदपत्रे जमा करावी. त्यानंतर लगेचच शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल असे प्रांताधिकारी प्रमोद भामरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देवून सांगितले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!