July 1, 2025 1:07 pm

श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे श्रीमती पार्वतीबाई बाजीराव बागल कला व वाणिज्य महाविद्यालयात निरोप समारंभ साजरा

अपनी भाषा में पढ़े! Translate

श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे श्रीमती पार्वतीबाई बाजीराव बागल कला व वाणिज्य महाविद्यालयात निरोप समारंभ साजरा
प्रतिनिधी आप्पासाहेब कोळी
श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे श्रीमती पार्वतीबाई बाजीराव बागल कला व वाणिज्य महाविद्यालयात तृतीय वर्ष कला या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता या समारंभात कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. प्राचार्य एन एल वाल्हे सर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शरद जी लेंडे साहेब दोंडाईचा शहर PSI तसेच उपप्राचार्य विश्वास पाटील सर प्रा. खासेराव पाटील सर प्रा.बोयेवार सर, प्रा.कातडे सर, प्रा. सिसोदिया सर प्रा.महेंद्र कोळी सर प्रा.व्ही एम पाटील सर , प्रा धुर्वेश पाटील सर प्रा.रामचंद्र मालिच सर, प्रा.आप्पा कोळी सर , राहुल भाऊसाहेब, गुलाबराव पाटील ,कृष्णा भाऊ सोनवणे, वनमलाताई भोसले, नितीनभाऊ चौधरी व तृतीय वर्ष कला चे विद्यार्थी उपस्थित होते.


शरद जी लेंढे साहेबांनी विद्यार्थ्यांना एमपीएससी बद्दल व शालेय शिक्षण घेत असताना पुढे जाऊन तुम्ही योग्य तो निर्णय कसा घेणार तसेच शिक्षणासंबंधी अमूल्य मार्गदर्शन केले प्रा. विश्वास पाटील सरांनी सांगत असताना त्यांनी आपल्या शालेय जीवनातील प्रसंग विद्यार्थ्यांसमोर व्यक्त केले अध्यक्ष भाषणात माननीय वाल्हे सर यांनी आपल्या भाषणात सांगितले की की मी याच महाविद्यालयात शिक्षण घेतले व याच महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झालो आणि आज याच महाविद्यालयात प्राचार्य पदावर ती काम करीत आहे सर म्हणतात आम्हाला तुमच्या मध्ये विद्यार्थी हा या समाजात समोर उभा करायचा आहे असे अमूल्य भाषण सरांनी दिले तुषार कोळी, शुभम पदमर ,शीतल राजपूत, सोनल पाटील, राहुल पारखे, हर्षाली पाटील, रविता कुंभार ,गोपाल निकम ,यांनी महाविद्यालया बद्दल व सर्व प्राध्यापकांना बद्दल आपले मनोगत व्यक्त केले याच विद्यार्थ्यांनी आठवण म्हणून महाविद्यालयात वृक्षरोपण ही केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविता कुंभार यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.बोयेवार सर यांनी केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!