करमाळा प्रतिनिधी :- करमाळा येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रशालेच्या वतीने दिनांक 19/4/2022 रोजी शाळापूर्व तयारी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पुढील वर्षी इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे हलगीच्या कडकडाटात स्वागत करण्यात आले. सिद्धार्थ नगर मधील बुद्ध विहारा पासून ते शाळेपर्यंत विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली. शाळेत आल्यानंतर शाळा पूर्व तयारी यासाठी तयार केलेल्या हॉलचे रिबन कापून उद्घाटन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. हॉलमध्ये बेंचवर विद्यार्थ्यांच्या शारीरिक, भावनिक, बौद्धिक विकासाचे व गणन पूर्वतयारी यांचे स्टॉल लावण्यात आले होते. दाखल पात्र विद्यार्थ्यांची नोंदणी करून स्टॉल निहाय स्वयंसेवक का तर्फे शाळापूर्व तयारी घेतली. सदर कार्यक्रमास हलगीच्या आवाजामुळे रंगत आली. सर्व विद्यार्थी आनंदी व उत्साही होते.
यावेळी श्री. प्रभाकर कांबळे (अध्यक्ष-एस.एम.सी.) श्री. शिलराज कांबळे, श्री. अशोक कांबळे, सौ. अर्चना ताई कांबळे (अंगणवाडी सेविका) सौ. ज्योती सदाफुले व इतर पालक उपस्थित होते. स्टॉलचे कामकाज श्री. दिपक जाधव सर व श्रीम. मालन शेख मॅडम यांनी पाहिले.