‘जिओ और जिनो दो’-भिगवण येथे महावीर जयंती उत्सवात साजरी
(निलेश गायकवाड)
मानवीय आहार शाकाहार, बेटी बचाव बेटी पढाव, धरती बचाव, सौर ऊर्जेचे महत्त्व आदी संदेश देत भिगवण येथे गुरुवारी सकल जैन समाजाने भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी केली. सकाळी भक्तीपूर्ण वातावरणात निघालेल्या मिरवणुकीत भक्ती, अहिंसा आणि जनजागृतीचा त्रिवेणी संगम अनुभवास आला.
गेल्या १७ वर्षांपासून भिगवण येथे सकल जैन समाजातर्फे भगवान महावीर जयंती साजरी करण्यात येते. हा उपक्रम परिसरात अभिनंदनीय ठरला आहे. यंदा श्री भगवान महावीर यांची जयंती महोत्सवात साजरी करण्यात आली. गुरुवारी सकाळी जैन मंदिरापासुन शोभयात्रा निघाली आसता ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या वतीने स्वागत करण्यात आले, मिरवणूक जैन स्थानक मार्गे पोलीस स्टेशन श्रीनाथ चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक,मेन पेठ मार्ग प्रभू मेडिकल येथे संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, सरपंच तानाजी वायसे, मा.संरपच पराग जाधव ,महेश शेंडगे, संजय देहाडे , प्रदीप वाकसे, अजिंक्य माडगे, महेंद्र बोगावत, मेघचंद्र दोशी ,पराग गांधी ,प्रशांत शेलार, मनोज राक्षे, बाळासाहेब भोसले अशोक काटे,गुराप्पा पवार, जावेद शेख, आबासो काळे, दत्तात्रय धवडे, यांसह जैन समाजातील आदींच्या प्रमुख उपस्थितीत मिरवणुकीस प्रारंभ झाला.तसेच माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सदिच्छ भेट देऊन समाजबांधव यांना जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या.

तसेच वर्षभर जैन समाज्याच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम व पूरग्रस्तांना केलेली मदत व पुर्नवसन कुटुंबाला मदतीचा हात, पर्यावरण, पाणीबचाव,बेटीबचाव, पशुधन बचाव, वृक्षारोपण आदी असे नानाविध उपक्रमात हिरेराने सहभागी होत आहेत .त्यांच्या कार्याला समाज्यातील सर्वच क्षेत्रातून कौतुक केले जाते .
पाणी, शीतपेय, खाद्यपदार्थांचे वाटप
मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी मिरवणुकीत सहभागी झालेल्या भक्तांसाठी पिण्याचे पाणी, सरबत, बिस्किट, खाद्यपदार्थांचे वाटप करण्यातआले होते.
संयोजन समिती
धर्नैंद्र गांधी, अभय रायसोनी, विजय बोगावत,सचिन बोगावत कमलेश गांधी, संजय रायसोनी चेतन बोरा, राहुल गुंदेचा, सचिन गांधी, अमोल शहा, संतोष गांधी, मनोज मुनोत,अभिषेक रायसोनी, प्रदीप बोरा किरण रायसोनी, अभय रायसोनी , प्रफुल्ल रायसोनी, शुभम बोरा प्रसाद बोगावत, पारस चुत्तर,पंकज दोशी, स्वप्नील गांधी ,रवी दोशी ,तिर्थनकर दोशी ,अभिनंदन दोशी ,सागर गांधी