कर्मयोगी कडून डॉ बाबासाहेब आंबेडकर व भगवान महावीर जयंती साजरी..
कर्मयोगी फाऊंडेशन तर्फे भारतीय घटनेचे शिल्पकार , भारतरत्न डाॕ. बाबासाहेब आंबेडकर व संपुर्ण जगाला सत्य व अहिंसेचा संदेश देणारे भगवान महावीर यांची जयंती प्रतिमेचे पुजन व माल्यार्पण पोलिस स्टेशन बुटीबोरीचे पोलिस निरिक्षक श्री.भिमाजी पाटील सर यांच्या हस्ते करत तहानलेल्यांची तृष्णा भागवुन मोठ्या उत्साहाने कृतीतून साजरी करण्यात आली. यावेळी पत्रकार सुभाष राऊत, पांडुरग राऊत, विनायक सातव, संजय बांते व कर्मयोगी फाऊंडेशनचे सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते..