June 30, 2025 5:34 am

एम.आर.पटेल सीबीएसई स्कूलच्या समर कॅम्प मध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक व खेळाडू दि. 13 व 14 एप्रिल रोजी करणार विशेष मार्गदर्शन

अपनी भाषा में पढ़े! Translate

शिरपूर : तालुक्यातील तांडे येथे श्री विलेपार्ले केळवणी मंडळ संचलित मुकेश आर. पटेल निवासी सीबीएसई स्कूल मध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तसेच खेळाडू हे दि. 13 व 14 एप्रिल रोजी खेळाडूंना विशेष मार्गदर्शन करणार आहेत.संचलित मुकेश आर. पटेल निवासी सीबीएसई स्कूल मध्ये दि. 8 ते 19 एप्रिल या कालावधीत समर कॅम्प आयोजित करण्यात आला असून विद्यार्थी अतिशय उत्साहात विविध खेळांचे प्रशिक्षण घेऊन खेळण्याचा मनमुराद आनंद घेत आहेत. खेळाडूंना दि. 13 व 14 एप्रिल रोजी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षक व खेळाडूंना बहुमोल मार्गदर्शन लाभणार आहे. समर कॅम्पमध्ये बॉक्सिंग, कुस्ती, घोडेस्वारी, क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन, बास्केटबॉल, व्होलीबॉल, कॅरम, बुद्धिबळ अशा विविध खेळांचे विशेष मार्गदर्शन केले जात आहे. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे सहसचिव नामदेव शिरगांवकर, भारताचे माजी अंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू व असोसिएशन ऑफ इंडियन फुटबॉल कोचेसचे संस्थापक संयुक्त संचालक दिनेश नायर, अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडू व १९८८ च्या सेऊल ऑलिम्पिकमधील ओलिंपियन मनोज पिंगळे, आशियाई क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेता व अर्जुन पुरस्कारप्राप्त कॅप्टन गोपाल देवांग, मध्य रेल्वे व जी.एम पुरस्कार प्राप्त तसेच छत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू व भारतीय महिला बास्केटबॉल प्रशिक्षक श्रीमती मनीषा डांगे, छत्रपती पुरस्कार विजेत्या कॅरम खेळाडू श्रीमती आयेशा मोहम्मद, राष्ट्रीय पदक विजेते व महाराष्ट्र बॉक्सिंग प्रशिक्षक अद्वैत शेंबावनेकर, भारताच्या माजी राष्ट्रीय बॅडमिंटनपटू श्रीमती संपदा शेट्ये, महाराष्ट्राचे डी.एस.ओ. प्रशिक्षक धीरज मिश्रा, रसायनी साई केंद्राचे प्रशिक्षक आशिष धायडे यांची प्रमुख उपस्थिती व विशेष मार्गदर्शन सत्र दिनांक 13 व 14 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आले आहे.एस.व्ही.के.एम. संस्थेचे अध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल, संस्थेचे सह-अध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष चिंतनभाई पटेल, व्यवस्थापन समिती सदस्य राजगोपाल भंडारी, शाळेच्या संचालिका श्रीमती गिरीजा मोहन, शाळेचे प्राचार्य पी. सुभाष यांच्या मार्गदर्शनाखाली समर कॅम्प घेण्यात येत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!