दौंड – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लोकप्रिय नेते यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचा दौंड येथे निषेध व्यक्त करण्यात आला.
दौंड प्रतिनिधी/ विकी ओहोळ
दौंड – दौंड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष व लोकप्रिय नेते शरद पवार यांच्या मुंबई येथील घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर चप्पल व दगड भिरकावले गेले व काही महिलांनी बांगड्या फोडून हल्ला करण्याचा प्रयत्न केला, याचा दौंड येथे निषेध व्यक्त केला गेला अशा गलिच्छ राजकारण करणाऱ्या व्यक्ती वर कारवाईची मागणी करण्यात आली.पक्षाच्या वतीने संविधान स्तंभ परिसरात धरणे आंदोलन व निषेध सभा घेण्यात आली यावेळी राष्ट्रवादी चे गुरमुख नारंग,वैशाली नागवडे,आपासो पवार ,वीरधवल जगदाळे पाटील,बाद शाह शेख, सोहेल खान,विकास खळदकर, अड.कावेरी पवार,दीपक सोनावणे,राजेश गायकवाड आदी उपस्थित होते समाजात द्वेष निर्माण करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी अशी मागणी दौंड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांना निवेदन देऊन हल्ल्यातील समाजकंटकांना त्वरित अटक करावी अशी मागणी वीरधवल जगदाळे यांनी केली यावेळी शहरातील विविध पक्षातील कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपस्थित होते.