July 1, 2025 12:58 pm

आमदार रोहित पवार यांच्या विशेष प्रयत्नातून साकत येथे उभारण्यात आले 13.02 कोटींचे सौर ऊर्जा प्रकल्प!

अपनी भाषा में पढ़े! Translate

आमदार रोहित पवार यांच्या विशेष प्रयत्नातून साकत येथे उभारण्यात आले 13.02 कोटींचे सौर ऊर्जा प्रकल्प!
प्रतिनीधी.संदिप कायगुडे
जामखेड | कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून मतदारसंघात विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना जास्तीत जास्त प्रमाणात कसा मिळेल यामुळे सतत प्रयत्न होत असल्याचे सातत्याने पाहायला मिळते. अशातच मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या विजेची अडचण दूर व्हावी व त्यांना शेतीसाठी अखंडित वीज पुरवठा व्हावा या उद्देशाने आमदार रोहित पवार यांनी सोलार प्रकल्पाची उभारणी करण्याचे काम हाती घेतले. शनिवारी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत जामखेड तालुक्यातील साकत येथे उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा आमदार रोहित पवार यांच्या हस्ते पार पडला.

साकत येथे उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाची क्षमता 3.1MW एवढी आहे. तसेच महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजने अंतर्गत EESL, टाटा सोलर पावर व महावितरणच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेला हा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे या प्रकल्पाची एकूण किंमत ही 13.02 कोटी रुपये एवढी आहे. आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून सोलार प्रकल्पाची विविध 150 कोटींहून अधिकची कामे मतदारसंघात मंजूर असून त्यापैकी बरीचशी कामे ही पूर्ण देखील झाली आहेत. शेतकऱ्यांची सोय व्हावी व पिकांना पाणी उपलब्ध होण्यासाठी विजेची होणारी अडचण लक्षात घेऊन आमदार पवारांनी सोलार प्रकल्पाची उभारणी केल्याने आता त्याचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल.

साकत येथील या सौर ऊर्जा प्रकल्पाचा फायदा साकत वीज उपकेंद्रातून वीज पुरवठा होणाऱ्या साकत, कोल्हेवाडी, कडभनवाडी, नानेवाडी व मोहा या गावातील एकूण 1207 वीज ग्राहक शेतकऱ्यांना होणार आहे. त्याशिवाय शेतकऱ्यांना शेतीसाठी आता दिवसा पाण्याची सोय उपलब्ध झाल्याने त्यांच्याकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या समजून त्या सोडवण्यासाठी सदैव तत्पर असल्याचं आमदार रोहित पवार यांनी बोलून दाखवलं आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!