June 30, 2025 4:44 pm

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा युवा सेनेच्या वतीने अभूतपूर्व इंधन दरवाढी विरोधात थाली बजाओ खुशियां मनाओ आंदोलन

करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात महागाईचा भडका उडाला असून सर्वसामान्य नागरिक होरपळत आहे भाजपच्या या मनमानी कारभाराला चाप बसविण्यासाठी करमाळा मधील भाजी मंडई पेट्रोल पंप येथे युवा सेनेचे शहर प्रमुख विशाल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली थाली बजाओ खुशियां मनाओ हे केंद्र सरकार विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी युवा सेना शहर प्रमुख विशाल गायकवाड यांनी सांगितले की, वाढत्या महागाई इंधन दरवाढीने आज पर्यंतचे देशातील सर्व उच्चांक पार केले असून केंद्र सरकारच्या गलथान कारभारामुळे जनता हतबल झाली असल्याने युवा सेनेचे जनआंदोलन युवा सेना सचिव वरुण सरदेसाई, सहसचिव अक्षय डोबळे, माढा लोकसभा युवा सेना विस्तारक उत्तम आयवळे व जिल्हा प्रमुख सचिन बागल यांच्या मार्गदर्शना खाली केले आहे.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, आज पेट्रोल ११७ तर डिझेल १०१ रुपयांपर्यंत गेले आहे तसेच घरगुती गॅस सिलेंडर तब्बल ९५० रुपयांना झाला आहे. जनतेच्या जीवावर सत्तेत बसलेल्या व त्याच जनतेच्या सर्वसामान्य प्रश्नांकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करून त्यांना महागाईच्या खाईत घालणाऱ्या अशा कुंभकरणासारख्या झोपलेल्या केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी आम्ही हे आंदोलन केले आहे. यापुढे नागरिकांनी दक्ष होऊन सत्तेची धुंदी चढलेल्या भारतीय जनता पक्षाला त्यांची जागा दाखवून द्यायला हवी. तसेच नागरिकांनी महागाई विरोधात पेटून उठले पाहिजे अन्यथा हा देश मूठभर भांडवलदारांच्या हातात जाऊन सर्वसामान्य जनता रस्त्यावर येईल.
यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख महेश चिवटे, शिवसेना महिला तालुका प्रमुख प्रियांका गायकवाड, शिवसेना तालुका उपप्रमुख बंडू शिंदे, माजी शहर प्रमुख संजय शिलवंत, युवा सेनेचे तालुका समन्वयक समाधान फरतडे, शहर उपप्रमुख प्रसाद निंबाळकर, करण काळे, चेतन शिंदे, नागेश लोकरे, सागर कोकाटे, भक्ती गायकवाड, ममतदेवी अवचर, सविता सुरवसे, सलोनी पठाण, आदी पदाधिकारी व बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!