धुळे पोलीस दलातर्फे नागरिकांना ऑनलाइन खरेदी विक्री पासून सावध राहण्याचे आवाहन!
प्रतिनिधी-स्वप्निल पवार
धुळे: सध्या शहरातील नागरिकांना फेसबुक , युटयुब , OLX अशा सोशल मिडीया वेबसाईटवर विविध वस्तू कमी किंमती विक्री करत असल्याचे सांगितले जाते व त्या करीता अॅडवान्स रक्कम भरण्यास सांगितले जाते व सायबर गुन्हगार हे आपल्याला Whatsapp तसेच SMS व्दारे लिंक पाठवली जात आहे या लिंक व्दारे आपल्या बँक खात्याची माहिती मिळविली जाते व अपली आर्थिक फसवणूक होते . अशा प्रकारच्या कोणत्याही लिंक ओपन करु नका असे , तसेच कोणत्याही अनोळखी व्यक्तीला पैसे तसेच आपल्या बँक खात्याची माहिती देऊ नका . आपल्या सोबत अशा प्रकारचा अपराध झाल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाणे येथे किंवा सायबर पोलीस ठाणे धुळे येथे संपर्क करा . तसेच आपण आपली तक्रार https://cvbercrime.gov.in/ या पोर्टलवर ही दाखल करु शकता . जनहितार्थ जारी : – श्री . प्रविणकुमार पाटील , पोलीस अधीक्षक , धुळे . सावध रहा … सुरक्षित रहा ..