शिरपूर : भारतीय जनता पार्टी शिरपूर तर्फे रविवार ( दि.27 मार्च) ला बबनराव चौधरी यांचा संपर्क कार्यालय येथे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या आयोजनाचा शहर व तालुक्यातील आलेल्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी लाभ घेतला. यावेळी मन की बात कार्यक्रम उत्तर महाराष्ट्र संयोजक तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा सह धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, जेष्ठ नेते एन. डी. पाटील, पं स. सदस्य चंद्रकांत पाटील, खंडेराव बाबा संस्थान उपाध्यक्ष संजय आसापुरे, मा. जिल्हा कोषाध्यक्ष आबा धाकड, शिरपूर भाजपा तालुका चिटणीस सुनिल चौधरी, अल्पसंख्याक मोर्चा जिल्हा सरचिटणीस मुबीन शेख, मन की बात कार्यक्रम तालुका सह संयोजक अजिंक्य शिरसाठ, शहर संयोजक रविंद्र भोई, शहर सह संयोजक अनिल बोरसे, युवा मोर्चा शहराध्यक्ष विक्की चौधरी, रविंद्र राजपुत, नंदु माळी, शिवम सोनार, स्वप्निल पाटील, प्रमोद पाटील आदिंसह शक्तीकेंद्र प्रमुख, बूथप्रमुख जिल्हा, तालुका, शहर प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त यांची प्रसमुख्याने उपस्थिती होती.*पंतप्रधान मोदींनी फुले, आंबेडकर जयंती व रमजाननिमित्त दिल्या शुभेछा*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व म्हात्मा ज्योतीराव फुले यांचा जयंती व रमजान सणानिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्यात. पदाधिकारींनी मन की बात कार्यक्रम न चुकता बघावा.. बबनराव चौधरी मन की बात कार्यक्रम झाल्यावर बैठक घेण्यात आली यावेळी बोलताना भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा मन की बात कार्यक्रम उत्तर महाराष्ट्र संयोजक बबनराव चौधरी म्हणाले की, पक्षाचे खासदार, आमदार, जि. प, पं स. सदस्य, नगरसेवक, सरपंच, उपसरपंच आदि लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मन बात कार्यक्रम महिन्याचा शेवटचा रविवारी न चुकता आवर्जुन बघितला पाहिजे तसेच ६ एप्रिल रोजी भाजपा स्थापना दिवस, ११एप्रिल रोजी म्हात्मा ज्योतिराव फुले व १४ एप्रिल रोजी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्याचे आवाहान हि त्यांनी केले.