July 1, 2025 2:10 am

मातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्वाला विद्या प्रतिष्ठान स्कूल, भिगवण कडून सलाम

अपनी भाषा में पढ़े! Translate

मातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्वाला विद्या प्रतिष्ठान स्कूल, भिगवण कडून सलाम

(निलेश गायकवाड)

दरवर्षी ८ मार्च रोजी महिला दिन साजरा केला जातो. आपल्या घरापासून ते देशाच्या विकासापर्यंत महिलांचे योगदान आहे. यादिवशी प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने महिलांप्रती आदर व्यक्त करतात. प्रत्येक `ती’ चं आपल्या आयुष्यातील स्थान अतिशय महत्त्वाचे आणि खास आहे. ‘ती’ ने केलेल्या प्रत्येक कार्याचा आम्हाला आदर आहे. अशा बऱ्याच गोष्टींची जाणीव ‘ती’ चा सन्मान करुन दिली जाते. प्रत्येक भूमिकेतील ‘ती’ चा सन्मान करण्यासाठी विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मिडियम स्कूल बिल्ट भिगवण येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. शनिवार दिनांक १९ मार्च २०२२ रोजी शाळेमध्ये माता पालकांसाठी महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नृत्य, फॅन्सी ड्रेस ,मनोरंजक खेळ, प्रश्नमंजुषा आणि मैदानी खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये माता पालकांनी उस्फूर्तपणे सहभागी होऊन बक्षिसे मिळवली.
वैयक्तिक नृत्य विजेत्या- इस्मत अली
माता- बालक नृत्य – प्रथम क्रमांक – सौ. चित्रा आदर्श
द्वितीय क्रमांक – सौ. कविता पटेल
फॅन्सी ड्रेस – प्रथम क्रमांक – सौ. अनुश्री चव्हाण
द्वितीय क्रमांक – सौ. अश्विनी कन्हेरकर
विभागून – सौ. आदिती गोडसे
या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ. सविता सोनवणे, सौ.मीनाताई बंडगर होत्या,सविता सोनवणे यांनी महिलादिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना मीनाताई बंडगर म्हणाल्या आत्ताची प्रत्येक महिला खास आहे तिने आपले घर परिवार सांभाळत प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करावी आशा शुभेच्छा दिल्या.
बारामती पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस हवालदार अमृता भोईटे व प्रिया पवार यांनी निर्भया पथक व महिला संरक्षण विषयी उपयुक्त माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शीतल धुमाळ व सौ.सोनाली ढवळे यांनी केले.
शाळेच्या प्राचार्या श्रीमती सरिता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. विद्या प्रतिष्ठान व्यवस्थापन समितीने या कार्यक्रमाचे कौतुक केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!