प्रगतिशील महाराष्ट्र २०२६ प्रदर्शनाला अमळनेरकरांनी आवर्जून भेट द्यावी. खा. स्मिता वाघ.

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20261006-WA0830

प्रगतिशील महाराष्ट्र २०२६ प्रदर्शनाला अमळनेरकरांनी आवर्जून भेट द्यावी. खा. स्मिता वाघ.

 

अमळनेर : विक्की जाधव.

केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि विकासकामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘प्रगतिशील महाराष्ट्र २०२६’ या विशेष प्रदर्शनाचे अमळनेर येथे आयोजन करण्यात आले आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार श्रीमती स्मिताताई उदय वाघ यांच्या पुढाकारातून आयोजित या प्रदर्शनात शासनाच्या विकासकामांची आणि विविध योजनांची माहिती नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.

या प्रदर्शनामध्ये कृषी, विज्ञान-तंत्रज्ञान, आरोग्य, उद्योग, शिक्षण, ऊर्जा, पर्यटन, वाहतूक यांसह विविध क्षेत्रांतील नवीन संकल्पना, आधुनिक तंत्रज्ञान तसेच महाराष्ट्राच्या विकासाची वाटचाल याबाबत माहिती देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, युवक, महिला तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी हे प्रदर्शन माहितीपूर्ण आणि उपयुक्त ठरणार आहे.

‘प्रगतिशील महाराष्ट्र २०२६’ हे प्रदर्शन अमळनेर शहरातील धुळे रोडवरील कलागुरु मंगल कार्यालय येथे दि. ७, ८ आणि ९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत खुले राहणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि विकासाची दिशा जाणून घ्यावी, असे आवाहन खासदार श्रीमती स्मिताताई उदय वाघ यांनी केले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!