आयुक्त मनिषा आव्हाळे व अतिरिक्त आयुक्त धीरज चव्हाण हे खरे गुन्हेगार आहेत!

अपनी भाषा में पढ़े! Translate

आयुक्त मनिषा आव्हाळे व अतिरिक्त आयुक्त धीरज चव्हाण हे खरे गुन्हेगार आहेत!
या दोघांना गांधारी भूषण व ध्रुतराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची मी शिफारस करणार!
दोन अपात्र उमेदवारांना केले पात्र
आयुक्त सौ. मनिषा आव्हाळे ज्या IAS अधिकारी आहेत, तसेच श्री धीरज चव्हाण हे अतिरिक्त आयुक्त असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक आहेत, या दोघा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोन अपात्र उमेदवारांची पात्र म्हणून शिफारस करण्याचा अक्षम्य अपराध केला आहे. *या दोन्ही अधिकाऱ्यांना माझे खुले आव्हान आहे, माझा दावा खोटा ठरवा आणि एक लाख रुपयांचे रोख बक्षीस घेऊन जा*.
स्पष्टच सांगायचे झाले तर पंचम ओम कलानी या शिक्षण तज्ज्ञ या प्रवर्गातून पात्र असल्याची शिफारस या दोन विद्वान अधिकाऱ्यांनी केली. शिक्षण तज्ज्ञ या व्याख्येत त्या अजिबात बसत नाहीत. ज्या दुनिचंद कलानी महाविद्यालयाच्या प्राचार्य व संस्थाचालकांनी अनुभवाचा व शिफारसीचा दाखला दिला आहे, तोच संगनमताने बनावट दिला आहे. *बरोबर पाच वर्षांपूर्वीची नेमणूक ही निव्वळ स्विकृत नगरसेवक निवड व्हावी म्हणून दिलेली आहे*.
या नेमणूक पत्रात स्पष्ट म्हटले आहे की, *जुनिअर कॉलेज मध्ये पार्ट टाइम lecturer म्हणून तिन तास इकॉनॉमिक्स या विषयावर व्याख्यान द्यायचे असून हे काम विना वेतन व विना मानधन करायचे असून पुढे मागे त्यासाठी दावा करता येणार नाही.* हे नेमणूक पत्र ज्याने दिले ते कलानी परिवार संचलित शाहिद दुनिचंद कलानी महाविद्यालयाचे सेवक आहेत. म्हणजे कलानी परिवाराच्या महाविद्यालयाने कलाणींच्या सुनेस हे पत्र दिले यातच सर्व गोलमाल आहे. आधी नेमणूक व नंतर शिक्षण व वयाचे पुरावे मागितले.
इतकेच करुन ते थांबले नाहीत तर शिफारस करताना चरित्र्याचा दाखला देऊन त्यांना उल्हासनगर महापालिकेत 5 वर्षासाठी स्विकृत नगरसेवक करावे अशी शिफारस केली आहे. कोणताही प्राचार्य अशी शिफारस करू शकत नाही. या वरून संगनमत स्पष्ट होते.
या पंचम कलाणींनी नामनिर्देशन सादर करताना आवश्यक पुरावे जोडलेले नव्हते,याच मुद्द्यावर छाननी करणाऱ्या विद्वान अतिरिक्त आयुक्त धीरज चव्हाण यांनी तो अर्ज बाद करावयास हवा होता. त्या ऐवजी त्यांनी सर्व कागदपत्रे जमा करण्यास सांगितले. *कागदपत्रांची पडताळणी करणे वेगळे व उमेदवारी अर्जासोबत न जोडलेली कागद पत्रे जोडणे यातला फरक या दोन विद्वान अधिकाऱ्यांना कळला नसेल का ?*
खरी गंमत तर पुढेच आहे, पंचम कलानी यांनी आपल्या शैक्षणिक पात्रते खेरीज आठ पानी पत्र पुरावे म्हणून सादर केले. त्यात वरील कागदपत्रांचा समावेश आहे.
आयुक्त व अतिरिक्त आयुक्त यांच्या बिनडोकपणाचा व भ्रष्ट प्रवृत्तीचा अजून एक पुरावा. *अतिरिक्त आयुक्तांनी जी कागदपत्रे मागितली ती सादर करताना जे कव्हरिंग लेटर जोडले आहे, त्यावर पंचम कलानी ज्या स्वतः उमेदवार आहेत, त्यांची स्वाक्षरीच नाही. त्यांच्या वतीने कोणीतरी for म्हणून सही केली आहे. या एकाच कायदेशीर त्रूटीमुळे त्यांचा अर्ज बाद झाला पाहिजे होता.* परंतू उप मुख्यमंत्री यांचा आदेश प्रमाण मानून प्रथम अतिरिक्त आयुक्त धीरज चव्हाण व नंतर IAS आयुक्त मनिषा ओव्हाळ यांनी अपात्र उमेदवारास पात्र ठरवले.
शिक्षण तज्ज्ञ म्हणवण्यासाठी ती व्यक्ती,, 20-25 वर्षे अध्यापन व संशोधन क्षेत्रातील कुशल व्यक्ती हवी, ती व्यक्ती उच्च शिक्षित किमान पोस्ट ग्रॅज्युएट असायला हवी व सेवानिवृत्त हवी, हे पंचम कलानीच्या बाबतीत
या बुद्धिमान अधिकाऱ्यांना कसे समजले नाही?
अपात्रास पात्र ठरवताना ज्या शिक्षण तज्ज्ञ प्रवर्गातून निवड करणार आहोत त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व अनुभव तपासणे हे त्यांचे कर्तव्य होते. तेथेही या दोन अधिकाऱ्यांनी आपली बुद्धी खुन्टीला बांधून ठेवली. *उपलब्ध दाखल्यानुसार पंचम कलानी ह्या सदर कानिष्ठ महाविद्यालयात साडे पाच वर्षे अर्ध वेळ व्याख्यात्या म्हणून कार्यरत होत्या. त्यांची वेतन पत्रिका कोणी मागू नये यासाठी त्या विना वेतन, विना मानधन काम करीत होत्या असे नमूद केले आहे.* ज्यांच्या शैक्षणिक पात्रतेचा थांगपत्ता, ठाव ठिकाणा नाही तो व्याख्यान कसा देऊ शकतो ?
आणि या दोन अतिविद्वान अधिकाऱ्यांची कीव यावी असा अपराध यांनी केला आहे.
एखादा पार्ट टाइम lecturer, जो विना वेतन, विना मानधन काम करीत असेल तर ती नोकरी मानली जात नाही, असा अनुभव हा कायद्याने अनुभव मानला जात नाही, हे या दोन अतिविद्वान अधिकाऱ्यांना कसे कळले नाही?*
या सर्व अनियमित्त डावलून अपात्र उमेदवारास पात्र ठरवणाऱ्या IAS अधिकाऱ्यास गांधारी भूषण व धुतराष्ट्र भूषण देण्याची शिफारस मी करणार आहे.
उद्या अजून एक लेख वाचा.
दिलीप मालवणकर
ज्येष्ठ पत्रकार
9822902470

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!