लॉन्ड्री दुकान-टपरीपासून नगरपरिषदेच्या सभागृहापर्यंत… संतोष जाधवांचा दोन मतांच्या विजयापासून गटनेतेपदापर्यंतचा संघर्षमय प्रवास!

अपनी भाषा में पढ़े! Translate

lad

लॉन्ड्री दुकान-टपरीपासून नगरपरिषदेच्या सभागृहापर्यंत… संतोष जाधवांचा दोन मतांच्या विजयापासून गटनेतेपदापर्यंतचा संघर्षमय प्रवास!

शेवगाव : प्रतिनिधी
राजकारणात मोठे घराणे, पैसा किंवा राजकीय वारसा नसतानाही सामान्य माणूस केवळ कष्ट आणि जनसंपर्काच्या जोरावर मनात जागा निर्माण करू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे नगरसेवक संतोष शरद जाधव. परीट समाजातील अवघ्या काही घरांपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज शेवगाव नगरपरिषदेच्या सभागृहात आणि राष्ट्रवादी काँग्रेस विकास आघाडीच्या गटनेतेपदाच्या चर्चेत केंद्रस्थानी आला आहे.उदरनिर्वाहासाठी कधीकाळी लॉन्ड्री दुकान आणि टपरी चालवणारा हा सर्वसामान्य तरुण आज जनतेचा प्रतिनिधी बनला आहे. टपरीवर बसलेला नागरिक, छोटा व्यावसायिक, कामगार किंवा रोजच्या प्रश्नांशी झगडणारा माणूस—या सर्वांशी थेट संपर्क राखल्याने त्यांना सामान्य माणसाच्या समस्यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. हीच त्यांची खरी ताकद ठरली.शेवगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रभाग ९-ब मधून संतोष जाधव यांनी अमोल सागडे यांचा अवघ्या दोन मतांनी पराभव केला. जाधव यांना ५०० तर सागडे यांना ४९८ मते मिळाली. सुमारे तीन हजार मतदार संख्या असलेल्या या प्रभागामध्ये एवढ्या अटीतटीच्या विजयाने शहरात चर्चेचा विषय बनला.नगरसेवक झाल्यानंतरही त्यांची राजकीय वाटचाल थांबली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस विकास आघाडीच्या विद्यमान गटनेते निलेश फुलचंद रोकडे यांनी राजीनामा दिल्यानंतर जाधव यांचे नाव गटनेतेपदासाठी पुढे आले. त्यांनी १६ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज सादर करून रोकडे यांच्या जागी स्वतःची गटनेते म्हणून नोंद करण्याची मागणी केली आहे.लॉन्ड्री दुकान-टपरीपासून सुरू झालेला हा प्रवास आता नगरपरिषदेच्या सभागृहातून गटनेतेपदाच्या राजकीय केंद्रस्थानी पोहोचला आहे. रस्ते, पाणी, स्वच्छता, अतिक्रमण आणि छोट्या व्यावसायिकांच्या प्रश्नांवर प्रभावी भूमिका घेण्याची अपेक्षा आता नागरिकांची वाढली आहे. पुढचे पाऊल काय असेल, याकडे शेवगावच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!