करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड):- करमाळा येथील महात्मा गांधी विद्यालयातील अकरावी सायन्स चा विद्यार्थी महेफुज अब्दुलकरीम पठाण या विद्यार्थ्याने पाच किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे या स्पर्धेत एकूण 400 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता याशिवाय रिले तसेच बांबू उडी यामध्ये त्याचा दुसरा क्रमांक आला आहे सदरच्या स्पर्धा ह्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय क्रीडा व मैदानी स्पर्धेचे आयोजन करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आल्या होत्या महेफूज पठाण याची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे
महफूज पठाण हा करमाळा येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील आयटी सहाय्यक क्लार्क अब्दुल करीम हामजे खान पठाण यांचा चिरंजीव असून प्रसिद्ध विधीज्ञ एडवोकेट आलिम पठाण यांचा तो पुतण्या आहे त्याला महात्मा गांधी विद्यालयातील क्रीडा शिक्षक दळवे सर पवार सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले
महेफूज पठाण याची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल त्याचे संस्थेचे चेअरमन माजी आमदार जयवंतराव जगताप, माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन शंभुराजे जगताप तसेच विद्यालयाचे प्राचार्य अनिस बागवान, पर्यवेक्षक महेश कांबळे, पर्यवेक्षिका सौ नवले मॅडम यांनी विशेष अभिनंदन केले आहे