चांदज ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ. पुजा पोपट सलमपुरे यांची बिनविरोध निवड
माढा /प्रतिनिधी अजिनाथ कनिचे

चांदज ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ. पुजा पोपट सलमपुरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल ग्रामस्थ, पदाधिकारी व मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या निवडीच्या प्रसंगी मा. श्री. शिवाजीराव बलभीम पाटील, मा. सोलापूर जिल्हा दूध संघ संचालक तसेच सौ. अंजनादेवी शिवाजीराव पाटील, मा. जिल्हा परिषद सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी कुलदीप भैया पाटील, अजिनाथ भाऊ तांबवे, बळीराम हेगडकर, बाबुराव हेगडकर, हनुमंत पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
सौ. पुजा पोपट सलमपुरे यांच्या बिनविरोध निवडीमुळे ग्रामपंचायतीच्या विकासकामांना अधिक गती मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. निवडीनंतर ग्रामस्थ व समर्थकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
