NSUI तर्फे पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्यातील मुलींची कबड्डी टीम राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रवाना

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260930-WA0564

NSUI तर्फे पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्यातील मुलींची कबड्डी टीम राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रवाना..

 

 

अमळनेर : विक्की जाधव.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रश्नांसोबतच त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील गुणवत्ता, प्रतिभा आणि जिद्दीला योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी NSUI जळगाव जिल्ह्याच्या वतीने महत्त्वपूर्ण पुढाकार घेण्यात आला आहे. NSUI जळगाव जिल्हाध्यक्ष ॲड. कौस्तुभ पाटील यांच्या पुढाकारातून जिल्ह्यातील विविध भागांतील महिला कबड्डी खेळाडूंना एकत्रित करून NSUIच्या बॅनरखाली जळगाव जिल्ह्याची मुलींची कबड्डी टीम प्रथमच राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रवाना झाली आहे.

भंडारा–गोंदिया येथे आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याची ही टीम आज जळगाव येथून उत्साहात रवाना झाली. यावेळी खेळाडूंसोबत त्यांचे प्रशिक्षक, पालक तसेच NSUIचे पदाधिकारी उपस्थित होते. आपल्या मुलींना राज्यस्तरावर खेळण्याची संधी मिळत असल्याबद्दल पालकांनी समाधान आणि आनंद व्यक्त केला. या संघात रोशनी पाटील, मानसी पवार, शुभांगी ठाकरे, भूमिका सैंदाणे, नेहा भादले, दिपाली पाटील, अस्मिरा शेख, गायत्री पाटील, सेजल ठाकूर आणि मयुरी पवार या खेळाडूंचा सहभाग आहे. या खेळाडूंना प्रशिक्षक राकेश पाटील यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे. यावेळी बोलताना NSUI जिल्हाध्यक्ष ॲड. कौस्तुभ पाटील म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी संघर्ष करताना त्यांच्या स्वप्नांना बळ देणे हीदेखील आमची जबाबदारी आहे. ग्रामीण व सर्वसामान्य कुटुंबातील खेळाडूंना राज्यस्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळावी, यासाठी NSUI सातत्याने प्रयत्नशील राहील. जळगावच्या या लेकींनी राज्यस्तरावर आपल्या खेळाची छाप पाडावी, यासाठी NSUI सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील.” खेळाडूंच्या भंडारा येथील निवास व भोजनाची व्यवस्था NSUIचे प्रदेश महासचिव अक्षत नंदरधने यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. त्यामुळे खेळाडूंना स्पर्धेदरम्यान आवश्यक सुविधा उपलब्ध होणार आहेत. टीमच्या रवाना प्रसंगी निखिल पाटील, महेंद्र पवार, ऋषिकेश जाधव, NSUI अमळनेर तालुकाध्यक्ष उमेश संदानशिव आणि प्रवीण पाटील यांच्यासह NSUIचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!