मक्याच्या ढिगाऱ्याखाली रेशनिंगची साखर! १५०० किलो साठा जप्त; रेशन दुकानावर पुन्हा धाड! अमळनेर तालुक्यात खळबळ

अपनी भाषा में पढ़े! Translate

file_00000000ee788230801641f205b88cd4

मक्याच्या ढिगाऱ्याखाली रेशनिंगची साखर! १५०० किलो साठा जप्त; रेशन दुकानावर पुन्हा धाड! अमळनेर तालुक्यात खळबळ

 

अमळनेर : विक्की जाधव.

तालुक्यातील नागाव खु. येथील प्रवीण रामपुरी गोसावी यांच्या खासगी गोडाऊनमध्ये मक्याच्या ढीगाऱ्या खाली दडवून ठेवलेली तब्बल १५०० किलो रेशनिंगची साखर आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

पुरवठा विभाग, महसूल विभाग आणि प्रांत कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्त कारवाई करत साखरेसह १००० किलो मका, १३०० किलो ज्वारी आणि २०० किलो तांदूळ ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी याच रेशन दुकानाबाबत लाभार्थ्यांचे अंगठ्याचे ठसे घेऊनही धान्य न दिल्याची तक्रार करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर झालेल्या कारवाईनंतर आता पुन्हा त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात धान्यसाठा आढळल्याने प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार विक्की जाधव यांनी पुरवठा विभागाच्या पुरवठा अधिकारी रुकसाना शेख यांच्या कार्यवाहीबाबत संशय व्यक्त करत अमळनेर प्रांत अधिकारी यांच्याकडे निवेदन दिले होते. त्यानंतर काही दिवसांतच पुन्हा संयुक्त कारवाई झाल्याने प्रशासन अखेर कामाला लागल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये सुरू झाली आहे.

संबंधित रेशन दुकानदार प्रवीण रामपुरी गोसावी हे पोलीस पाटील तसेच रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष असल्याचे सांगण्यात येत असून, त्यांच्या या प्रतिष्ठेमुळे प्रशासन कारवाई करताना दबावाखाली होते का, असा प्रश्न यापूर्वी उपस्थित करण्यात आला होता.

मात्र, गावकऱ्यांच्या तक्रारी आणि पाठपुराव्यानंतर झालेल्या सलग कारवायांमुळे प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे.

दरम्यान, या प्रकरणात तालुक्यातील एका स्थानिक राजकीय पुढाऱ्याने हस्तक्षेप केल्याचा आरोपही काही गावकऱ्यांनी केला आहे. संबंधित पुढाऱ्याकडून प्रशासनातील अधिकाऱ्यांना फोन करून कारवाईवर दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. या आरोपांची स्वतंत्रपणे अधिकृत पुष्टी झालेली नसली तरी रेशनच्या धान्याबाबत पारदर्शक चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. या कारवाईच्या वेळी पुरवठा अधिकारी रुकसाना शेख, कुलकर्णी रावसाहेब, निकम रावसाहेब, तलाठी सुधीर पाटील, पोलीस प्रशासन आणि गावकरी उपस्थित होते.

या संपूर्ण प्रकरणाचा ‘मार्मिक’ कडून पाठपुरावा सुरू असून, रेशन धारकांना आवाहन करण्यात येते की आपल्या परिसरातही अशा प्रकारची रेशन चोरी होत असल्यास संबंधित प्रशासन किंवा मार्मिकशी संपर्क साधा 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!