तू माझे दोन पाडशील तर मी तुझे चार पाडेन

अपनी भाषा में पढ़े! Translate

तू माझे दोन पाडशील तर मी तुझे चार पाडेन
उल्हासनगरमध्ये शिंदेसेना-भाजपात जुम्पली
उल्हासनगर महापालिकेत स्विकृत नगरसेवक पदाचा बिन पैश्याचा तमाशा रंगात आला आहे. सत्तेत वाटेकरी असलेले शिंदे सेना व भाजपात जे युद्ध सुरू आहे, त्यावरून महाभारताच्या यद्धाची आठवण झाली. दोन्हीकडे आप्त स्वकीय आहेत आणि ते एकमेकांचा पाडाव करण्यात धन्यता मानत आहेत. तिथे रक्ताचे पाट वाहिले येथे लाखोंचा चुराडा होत आहे. उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय परत उच्च न्यायालयात वकिलांवर लाखो रुपये उधळले जात आहेत. *निवडणुकीत एकमेकाला कसे आडवे पाडायचे याचे डाव आखले जात आहेत.
विरोधी पक्ष नाहीच, त्यामुळे हा सत्तेची मलाई लुटण्याची जीवघेणी स्पर्धा सुरू आहे. जनता हतबलतेने सर्व पाहत आहे. तिच्याकडे दूसरा पर्यायच शिल्लक ठेवलेला नाही*
*उल्हासनगरची शिवसेना कधीकाळी शिखरावर होती आज ती कलानीच्या दावणीला बांधून ठेवली आहे. उद्या परवा ओमी कलानी उल्हासनगर शिवसेनेचा शहरप्रमुख होईल आणि राजेंद्र चौधरी, राजेंद्रसिंह भुल्लर, रमेश चव्हाण कलानी महलवर साहेबांच्या बुलाव्याची वाट पाहत असतील, गर्जा महाराष्ट्र माझा ऐवजी जिये~ जिये ~पप्पू कलानीच्या जिये, असांजो शेर आयो!च्या तालावर मराठी अस्मितेचे वारसदार झीन्गतील.पप्पू कलानी ओमी कलानीच्या मध्ये चौधरी, भुल्लर, चव्हाण, आशान, सारखे लोकांच्या मुंडक्या आसपास दिसतील (होर्डिंगवर). *मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी कलाणींचे हात मजबूत करा, असे छाती फुगवून मराठी शिवसैनिक सांगतील. बाळासाहेब व दिघेसाहेब या शिंदे सैनिकांवर फुलांचा वर्षाव करतील आणि म्हणतील, बरे झाले हे पाहायला आम्ही नाही ते.* खासदारांचे कार्यालय कलानींच्या ताब्यात देऊन खासदार दिल्लीत रममाण होतील. *शिंदे सेनेचे तथाकथित नगरसेवक व शिंदे सैनिक मावळे बनून कलाणींचे कमांडो म्हणून मिरवतील*.
याची सुरुवात लवकरच होणार आहे. भाजपने शिंदे सेनेचे उमेदवार पाडण्याचा वीडा उचलला आहे तर शिंदे सेना दोन पावले पुढे आहे. *या सत्ता संघर्षात पहिला बळी पंचम कलानीचा जाणार आहे. दुसरीकडे प्रदीप रामचंदनी हे स्विकृतची हॅट्ट्रिक करू शकणार नाही.त्याची विकेट पडणार आणि रविंद्र चव्हाण यांचा फेव्हरेट उमेदवार धरातीर्थी पडणार. रमेश चव्हाण, आशा पवार, जीवन ईदनानी हे अपात्र ठरून बाद होतील.*
*भाजपचे दोन पाडले तर शिंदे सेनेचे चार पाडतील. या पाडापाडीत उल्हासनगरची जनता भरडली जाणार आहे*
यात एक फायदा नक्की होणार आहे. तो म्हणजे जे लंगडे घोडे म्हणून दुर्लक्षित मानले जात होते त्यांची लॉटरी लागणार आहे. डॉ. नाथानी, ऍड. हरेश ईदनानी, प्रा.सुरेश सोनवणे, प्रमोद टाले, बाळा श्रीखंडे, निलेश बोबडे, सारख्याना अचानक उमेदवारी मिळू शकते. भाजपने चारच उमदेवार उभे करुन मोठी रिस्क घेतली आहे. जे एक दोन उमेदवार अपात्र ठरतील त्या जागी त्यांना अपक्ष उमेदवारांना स्वीकारावे लागेल.
*या सर्व उलाढालीचा उल्हासनगरकरांचा काय फायदा? तर फायदा नसून नुकसान होणार. 76 नगरसेवकांच्या हिश्यात 7 वाटेकरी वाढून भ्रष्टाचार 10 % वाढणार*.
दिलीप मालवणकर
ज्येष्ठ पत्रकार
9822902470

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!