एसटी म्हणजे सामान्य माणसाचा विश्वास’;‘जळगावचा वाटा कमी पडू देणार नाही’ पालकमंत्री गुलाबराव पाटील

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260929-WA1239

‘एसटी म्हणजे सामान्य माणसाचा विश्वास’;‘जळगावचा वाटा कमी पडू देणार नाही’ पालकमंत्री गुलाबराव पाटील

 

जळगावच्या ताफ्यात नव्या ‘राजमाता जिजाऊ’सात नव्या बसेस पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण; विभागातील ‘जिजाऊ’ बसेसची संख्या ७० वर

 

मार्मिक न्यूज नेटवर्क : विक्की जाधव.

“एसटी म्हणजे सामान्य माणसाचा विश्वास आहे. गाव कितीही लहान असो, रस्ता कसाही असो, एसटी त्या माणसापर्यंत पोहोचते. गेल्या काही वर्षांत जळगावच्या एसटी सेवेत मोठा बदल झाला असून, इलेक्ट्रिक बसेसनंतर आता ‘राजमाता जिजाऊ’च्या नव्या बसेसही प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहेत. राज्यात नव्या गाड्या येत असताना जळगावचा वाटा कमी पडू देणार नाही. त्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे,” असे प्रतिपादन पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.*

जळगाव बस आगाराच्या प्रांगणात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सात नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेसचे पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते पूजन व फीत कापून लोकार्पण करण्यात आले. या सात बसेसमुळे जळगाव विभागातील ‘राजमाता जिजाऊ’ बसेसची संख्या ६३ वरून ७० झाली आहे.

पालकमंत्रीगुलाबराव पाटील म्हणाले, “महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत मिळाल्यानंतर आपल्या मायबहिणींचा एसटीवरील विश्वास आणि प्रवास दोन्ही वाढले आहेत. जिजाऊंनी शिवरायांना घडवले आणि शिवरायांनी स्वराज्य घडवले. आजही प्रत्येक घर घडवण्यात आईच्या संस्कारांचा मोठा वाटा असतो. त्यामुळे ‘राजमाता जिजाऊ’ हे केवळ बसचे नाव नाही; घराघरातील मातृशक्तीला दिलेला सन्मान आहे.”
राज्यात सुमारे तीन हजार ‘राजमाता जिजाऊ’ बसेस टप्प्याटप्प्याने प्रवासी सेवेत दाखल होणार आहेत.

जळगाव विभागात यापूर्वी ६३ बसेस कार्यरत होत्या. नव्या सात बसेसमुळे ही संख्या ७० झाली आहे. याशिवाय जळगाव आगारात ३०, तर चोपडा आगारात २० इलेक्ट्रिक बसेस कार्यरत आहेत.
नव्या बसेसबरोबरच प्रवाशांना मिळणाऱ्या सेवेचा आणखी दर्जाही उंचावला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करत पालकमंत्री पाटील म्हणाले, “गाड्या वाढल्या, सुविधा वाढल्या; आता स्वच्छता, सुरक्षितता आणि वेळेचे पालन यावरही तितकाच भर हवा. गाडी महामंडळाची असली तरी त्यात बसलेला प्रत्येक प्रवासी आपला माणूस आहे. त्याला सुरक्षित आणि वेळेत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे.” जळगाव जिल्ह्याला अधिकाधिक आधुनिक बसेस मिळाव्यात आणि प्रवाशांना वाहनांची कमतरता भासू नये, यासाठी पाठपुरावा सुरूच ठेवणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

या लोकार्पण सोहळ्यास आमदार सुरेश भोळे, जळगाव महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांच्यासह जळगाव विभागाचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे, यंत्र अभियंता सचिन पवार, आगार व्यवस्थापक संदीप पाटील, विभागीय वाहतूक अधीक्षक मयूर पाटील, कामगार अधिकारी प्रवीण पाटील, सांख्यिकी अधिकारी रवींद्र पवार यांच्यासह एसटी महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी केले.

सूत्रसंचालन प्रसिद्धी सचिव गोपाळ पाटील यांनी केले, तर आभार आगार व्यवस्थापक संदीप पाटील यांनी मानले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!