पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी
अमळनेर : विक्की जाधव.
पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शिक्षण विभाग जळगाव व पंचायत समिती अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी प्राप्त करीत तालुक्यातून प्रथम क्रमांक प्राप्त करीत विजयी-जिल्हा स्पर्धेसाठी निवड
जळगाव जिल्हा परिषद शिक्षण विभाग व अमळनेर पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने तालुकास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव याचे आयोजन करण्यात आले होते. सदर नाट्य तालुकास्तरीय विभागानुसार आयोजन हे रोटरी क्लब हॉल पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूल येथे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे औपचारिक सुरुवात माननीय गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती अमळनेर सौ. कविता सुर्वे यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. अनेक पंचायत समिती अधिकारी, मुख्यप्रशासनाधिकारी तसेच अनेक पालक वृंद व विज्ञान क्षेत्रात कार्य करणारी ज्येष्ठ अध्यापक मंडळी माननीय मुख्याध्यापक हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. यामध्ये गणित विज्ञान मंडळाचे अध्यक्ष श्री निरंजन पेंढारे साहेब हे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते. सदर नाट्योत्सवासाठी अमळनेर तालुक्यातील आठ शाळांनी उत्स्फूर्त व ध्येयवादी विचार दृष्टिकोनातून अभिनव कलाकृती सादर करण्याच्या संकल्पनेमधून यामध्ये आपला सहभाग नोंदविला होता. या नाटकासाठी ज्येष्ठ विज्ञान शिक्षक श्री. भाऊसाहेब देशमुख श्री. दिनेश नाईक या पंच परीक्षक म्हणून उपस्थित होते. अतिशय उत्कंठावर्धक वेगळ्या धाटणी मध्ये विज्ञान संकल्पना सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यांच्या मनामध्ये विज्ञान विषयावर आवड जिज्ञासा आकर्षण व संशोधन वृत्ती वाढावी ही भावना यामागे संकल्पना स्वरूपात दडलेली दिसून येते. अंतिम फेरीत विद्यार्थ्यांनी उत्तम स्वरूपात विज्ञान नाटिका सादर करून त्यांनी ऐतिहासिक कामगिरी करून आपले नाव विजयश्री प्राप्त करून सुवर्ण अक्षरांमधून आपले नावलौकिक केले. सदर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तंत्रशुद्ध माहिती व अभिनयाप्रती बारकावे व सखोल ज्ञान देण्याचे कार्य विज्ञान शिक्षिका स्वाती माळी यांनी केले. विजयश्री प्राप्त केलेला संघ चमू पुढीलप्रमाणे- दिक्षिता भामरे, स्वरा कासार, विधी पाटील, परिणीती शिंदे, कुणाल बोरसे, प्रणाली सैंदाणे पुष्करा राजपूत, मयंक राजपूत, आरुषी महाजन यांनी उत्तम नाट्य कलाकार म्हणून आपली भूमिका अदा केली. सदर या नाटकासाठी मार्गदर्शन सर्वतोपरी सहकार्य शाळेचे चेअरमन डॉ. संदेश गुजराथी ,मुख्याध्यापक जे. एस.देवरे, पर्यवेक्षक महेश माळी पर्यवेक्षिका मीनाक्षी बारी, डिंपल देसाई, प्रशांत वंजारी, व्ही.एस.अमृतकर, श्रावण पाटील, व्ही.पी.बडवे समस्त शिक्षक वृंदवर्ग व शिक्षक केंद्र कर्मचारी वृंदवर्ग यांचे लागले.