सिमेंटच्या भिंतींपलीकडे माणुसकीची नाती; अमेय मुंदडा यांच्या विकासदृष्टीची नवी ओळख..
अमळनेर : विक्की जाधव.
एखाद्या शहराचा विकास केवळ मोठ्या इमारतींनी होत नाही, तर त्या इमारतींच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात सुविधा, सुरक्षितता, आपुलकी आणि नव्या स्वप्नांची उमेद निर्माण झाली तर त्या विकासाला खरा अर्थ प्राप्त होतो. अमळनेरच्या बदलत्या विकासकथेत युवा उद्योजक अमेय ओमप्रकाश मुंदडा यांचे नाव याच दृष्टिकोनातून पुढे येते. महानगरांमध्ये मिळणाऱ्या आधुनिक सुविधा अमळनेरकरांनाही आपल्या शहरात अनुभवता याव्यात, या विचारातून मुंदडा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या माध्यमातून त्यांनी बांधकाम क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
स्थापत्य अभियंता असलेल्या अमेय मुंदडा यांनी NICMAR संस्थेतून Construction Management चे शिक्षण घेतले. तांत्रिक शिक्षण, आधुनिक व्यवस्थापन आणि वडील ओमप्रकाश (भाऊ) मुंदडा यांचा बांधकाम क्षेत्रातील अनुभव या तिन्हींची सांगड घालत त्यांनी २०१६ पासून व्यावसायिक वाटचाल सुरू केली. मुंदडा इस्टेट, मुंदडा सिग्नेचर, मुंदडा मॅजेस्टिक, मुंदडा एक्झोटिका, मुंदडा सॉलिटेअर, मुंदडा स्टेटस, मुंदडा आयकॉन, मुंदडा हाइट्स, मुंदडा हायस्ट्रीट आणि मुंदडा सिटी अशा विविध प्रकल्पांमधून अमळनेरच्या वास्तुरचनेला आधुनिकतेची जोड देण्याचा प्रयत्न झाला. गेस्ट रूम, इनडोअर प्ले एरिया, ओपन थिएटर, टेरेस गार्डन, जिम, सिट-आऊट, मिनी पूल, मंदिर आणि आकर्षक परिसर अशा सुविधांमधून नागरिकांना केवळ घर नव्हे, तर आनंददायी जीवनशैली देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
या प्रवासाची आणखी एक महत्त्वाची बाजू म्हणजे सामाजिक आणि पर्यावरणीय बांधिलकी. घर विकल्यानंतरही रहिवाशांशी नाते कायम राहावे, वसाहतींमध्ये सण-उत्सव आणि सामाजिक उपक्रमांमधून एकोपा वाढावा, यासाठी अमेय मुंदडा स्वतः पुढाकार घेत असल्याचे दिसते. ग्रीन कॅम्पेन अमळनेर अंतर्गत दरवर्षी ५०० झाडे लावण्याच्या उपक्रमात सहभाग, बांधकामात टाकाऊ प्लास्टिकचा योग्य पुनर्वापर तसेच उद्यानांच्या भिंतींवर थोर व्यक्तींची चित्रे आणि प्रेरणादायी संदेश साकारून नव्या पिढीला इतिहास आणि संस्कृतीशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे.
अमेय मुंदडा यांची ही वाटचाल केवळ एका युवा उद्योजकाच्या व्यवसायाची कथा नाही; ती अमळनेरच्या बदलत्या स्वप्नांचीही गोष्ट आहे. आपल्या शहरातही आधुनिक सुविधा, सुंदर परिसर आणि दर्जेदार जीवनशैली असावी, या नागरिकांच्या अपेक्षांना आकार देण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत आहे. उंच इमारती उभारणे ही एक बाब आहे; मात्र त्या इमारतींमध्ये माणुसकी, नाती, पर्यावरण आणि उद्याची उमेद जपण्याचा प्रयत्न झाला, तर शहराची उंची केवळ मजल्यांनी नव्हे तर विचारांनीही वाढते.