भिगवणमध्ये प्रशासनाचा धाक संपला का? उघडपणे सुरू आहे गुटखा विक्रीचा काळा बाजार!

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-09-29 at 1.31.04 PM

भिगवणमध्ये प्रशासनाचा धाक संपला का? उघडपणे सुरू आहे गुटखा विक्रीचा काळा बाजार!

रात्रीच्या अंधारात होतोय गुटखा सप्लाय, गुटखा किंग कोण? – नागरिकांचा संतप्त सवाल

(निलेश गायकवाड)

भिगवण (प्रतिनिधी) – महाराष्ट्रात गुटखाबंदी असताना देखील भिगवण आणि परिसरात गुटखा मिळतोच कसा? हा सवाल आज प्रत्येक सुज्ञ नागरिक विचारत आहे. शाळा, कॉलेजच्या परिसरात, पान टपरीवर, किराणा दुकानात राजरोसपणे गुटखा विकला जात आहे आणि प्रशासन मात्र डोळे झाकून बसले आहे.

दिवसा लपून-छपून आणि रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा भिगवणमध्ये उतरवला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. एक-दोन पुड्या नाही तर पोते-पोत्याने गुटखा येतो कुठून?

भिगवणचा गुटखा किंग कोण?

या अवैध धंद्यामागे एक मोठा मास्टरमाईंड, एक ‘गुटखा किंग’ असल्याची चर्चा तालुक्यात दबक्या आवाजात सुरू आहे. हा किंग रात्रीतून गाड्या भरून माल पुरवतो आणि दिवसा छोटे विक्रेते तो चढ्या दराने विकतात. यातून लाखो रुपयांची उलाढाल होत असून तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे.

जर प्रशासनाने तातडीने पाऊले उचलली नाहीत, तर या गुटख्यामुळे भिगवणमधील तरुण पिढीचे भविष्य अंधारात जाणार आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!