नगाव खुर्दमध्ये रेशन वितरणाचा गोंधळ? लाभार्थ्यांचे अंगठे घेतले, मात्र धान्य मिळाले नसल्याची तक्रार; पुरवठा विभागाच्या कारवाईवर देखील प्रश्नचिन्ह!

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260929-WA0848

नगाव खुर्दमध्ये रेशन वितरणाचा गोंधळ? लाभार्थ्यांचे अंगठे घेतले, मात्र धान्य मिळाले नसल्याची तक्रार; पुरवठा विभागाच्या कारवाईवर देखील प्रश्नचिन्ह!

अमळनेर : विक्की जाधव.

रेशन दुकान क्रमांक १५२ संदर्भात सप्टेंबर २०२६ महिन्याचे धान्य लाभार्थ्यांना वितरित न करता त्यांचे अंगठे घेण्यात आल्याची गंभीर तक्रार समोर आली आहे. याबाबत नगाव खुर्दच्या सरपंचांनी अमळनेर प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांच्याकडे तक्रार केली होती. तक्रारीची दखल घेत पुरवठा विभागाच्या अधिकारी रुकसाना शेख यांनी प्रत्यक्ष ठिकाणी उपस्थित राहून पंचनामा केला.

IMG-20260929-WA0851

पंचनाम्यादरम्यान सप्टेंबर महिन्याचे धान्य नागरिकांना मिळाले नसल्याची बाब तक्रारदारांकडून सांगण्यात आली, तर रेशन गोदामात धान्याची पोती आढळून आल्याचेही समोर आले. त्यामुळे लाभार्थ्यांचे अंगठे घेतल्यानंतर प्रत्यक्ष धान्य वितरण झाले का, धान्य नेमके कुठे गेले आणि रेशन वितरणाची नोंद कशी करण्यात आली, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

दरम्यान, गावकऱ्यांनी पुरवठा अधिकारी आणि रेशन दुकानदार यांच्यात संगनमत असल्याचा आरोप करत संबंधितांवर कारवाई का होत नाही, असा प्रश्न उपस्थित केला आहे. मात्र या आरोपांबाबत पुरवठा अधिकारी रुकसाना शेख यांनी कोणतेही अधिकृत स्टेटमेंट देण्यास संमती दर्शवली नाही. पंचनाम्याच्या वेळी नागरिकांना व्हिडीओ चित्रीकरण करण्यास मज्जाव करण्यात आल्याचेही गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

IMG-20260929-WA0850

विशेष म्हणजे, तक्रारीच्या चौकशीवेळी रेशन दुकानदार स्वतः उपस्थित नसून त्यांच्या वतीने प्रवीण गोसावी उपस्थित होते, तर तक्रारदार स्वतः घटनास्थळी उपस्थित होते. आता पंचनाम्यात नेमके काय निष्पन्न झाले, सप्टेंबर महिन्याचे धान्य लाभार्थ्यांना मिळाले की नाही, अंगठे घेतल्यानंतर वितरण न झाल्याच्या आरोपांची चौकशी कशी होणार आणि दोष आढळल्यास कोणावर कारवाई होतें.

दरम्यान, पंचनामा व चौकशीची प्रक्रिया पूर्ण करून पुरवठा अधिकारी रुकसाना शेख अमळनेरच्या दिशेने परतत असताना त्यांनी पुन्हा आपला वाहनमार्ग नागाव खुर्दच्या दिशेने वळवून या प्रकरणातील उर्वरित कारवाई पूर्ण केल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी पोलिसांचा बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. त्यामुळे रेशन वितरणाच्या या प्रकरणात प्रशासनाकडून पुढील तपासाला वेग आल्याचे चित्र दिसून आले.

दरम्यान, तक्रारदारांनी रेशन दुकानदार आणि पुरवठा अधिकारी रुकसाना शेख यांच्यात संगनमत असल्याचा आरोप करत, गावातील सर्व रेशनकार्डधारकांचे पुन्हा स्वतंत्र पंचनामे करून संपूर्ण प्रकरणाची दुसऱ्या अधिकाऱ्यामार्फत निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. आता या प्रकरणातील पंचनाम्यात नेमके काय निष्पन्न होते, आरोपांची चौकशी कोणत्या दिशेने जाते आणि दोष आढळल्यास संबंधितांवर कोणती कारवाई केली जाते, याकडे नागाव खुर्दसह परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!