एक IAS आयुक्त इतके बिनडोकपणे कश्या वागू शकतात?

अपनी भाषा में पढ़े! Translate

एक IAS आयुक्त इतके बिनडोकपणे कश्या वागू शकतात?
ज्यांना शिक्षणातज्ञ् चा अर्थ काळात नाही
ज्यांना अनधिकृत बांधकाम ही अपात्रता वाटत नाही ?
उल्हासनगर महानगर पालिकेच्या स्विकृत नगरसेवक पदाची निवड प्रक्रिया न भूतो न भविष्यती गाजली. त्यात राजकीय पक्षांनी एकमेकांवर कुरघोडी करणे, शह कटशाहचे गलिच्छ राजकारण करणे ही बाब नित्याची झाल्याने त्याबाबत आश्चर्य वाटत नाही.
आपल्या नावासमोर आयुक्त- भा.प्र. से.असे दिमाखात मिरवणारी व्यक्ती जी शासनाचे लाखोचे वेतन, भत्ते व सुविधा घेते, ज्याने शासकीय नियम व अधिनियमांची काटेकोर व निस्पक्ष अंमलबजावणी पारदर्शकपणे बजावणे हे ज्यांचे कर्तव्य आहे, ती व्यक्ती राजकीय दबावाखाली जर बेकायदेशीरपणे राजकारण्यांना अनुकूल असे गैरवर्तन करीत असेल तर ते वर्तन आयुक्त पदास व IAS ला कलंकित करणारा असतो.
उल्हासनगर महापालिकेच्याआयुक्त ज्या IAS आहेत, त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या व निवडणूक आयोगाच्या आदेशाशी विसंगत कृत्य केले असेल तर ते बीनडोकपणाचे कृत्य आहे, असे माझे मत आहे.
स्विकृत नगरसेवक निवड प्रक्रियेत महाराष्ट्र महानगर पालिका अधिनियम 1949 च्या तरतुदीचे पालन करणे बंधनकारक आहे. कलम अ नुसार नामनिर्देशनासाठी अर्हता मध्ये (ख) मध्ये शिक्षण तज्ञास मान्यता आहे.त्यासाठी किमान पाच वर्षे “मान्यताप्राप्त शाळा किंवा महाविद्यालयाच्या सेवा निवृत्त प्राध्यापक, व्याख्याता, मुख्याध्यापक असलेल्यांचा समावेश आहे.
आमच्या IAS आयुक्त मॅडमनी एका तथाकथित part time ते ही विना वेतन, मानधन घेता, lecturer म्हणून पाच वर्षे काम केल्याच्या दाखल्यास ग्राह्य धरून नामनिर्देशन अर्ज पात्र ठरवला. बरं ही उमेदवार कोण तर त्यांच्याच कुटुंबाच्या असलेल्या महाविद्यालयाचे वरील प्रमाणे पत्र घेतलेली उमेदवार. प्राचार्य ही नातेसंबंधातील.
या उमेदवाराने नोकरीसाठी कधी अर्ज केला, कधी मुलाखत घेतली याचा थांगपत्ता नाही. शैक्षणिक पात्रतेचा उल्लेख कुठेही नाही. माझ्या माहिती प्रमाणे सदर महिला उमेदवार पदवीधर ही नाही. विना मानधन काम करणाऱ्या व्यक्तीस नोकर मानले जात नाही, असा अनुभव, पात्र मानला जात नाही. हे IAS अधिकाऱ्यांना पडताळणीच्या वेळी कसे ध्यानात आले नाही?
शिक्षण तज्ज्ञ कोणास मानावे ? हे ही आमच्या IAS आयुक्तांना ठाऊक नसावे. ज्याने 15-20 वर्षे प्राध्यापक, मुख्याध्यापक वा व्याख्याता म्हणून मान्यता प्राप्त संस्थेत तज्ज्ञ म्हणून सेवा दिली असेल, एखाद्या विषयात प्रविण्य असेल, संशोधन केलेले असेल, डॉक्टरेट मिळवली असेल, अशी सेवा निवृत्त व्यक्ती तज्ज्ञ मानली जाते, हे आमच्या IAS आयुक्तांच्या ध्यानात कसे आले नाही?
स्वतःच्या कुटुंबाच्या मालकीच्या महाविद्यालयातून निवडणूक लढविण्यासाठी वा स्विकृत नगरसेवक पद मिळवण्यासाठी प्राचार्याचे पत्र ग्राह्य धरणे हा कुठला बुद्धि प्रामाण्यपणा? कोणताही प्राचार्य अमूक अमुक व्यक्तीस पाच वर्षासासाठी स्विकृत करण्यात यावे, अशी शिफारस करू शकत नाही. आमच्या IAS आयुक्तांच्या ध्यानात ही बाब कशी आली नाही? पाच वर्षे विना मानधन तेही आठवड्यातून तिन दिवस व्याख्यान देणारी, हजेरीपटावर नाव नसलेली, वेतन पत्रकावर नाव नसलेली तसेच पदवीधर व B . Ed., D . Ed. नसलेली व्यक्ती विद्यापीठाची मान्यता नसलेली शिक्षणातज्ञ् मानली जात असेल तर खऱ्या शिक्षण तज्ञांनी यांच्या घरी भांडी घासायची का?
*आयुक्त या गंभीर बाबी न तपासता डोळे झाकून शिक्षणातज्ञ् म्हणून स्विकृत नगरसेवक पदासाठी पात्र मानत असतील तर त्यांच्या IAS पणावर प्रश्नचिन्ह उभे राहते. त्यांनी सत्ताधारी राजकारण्यांची मर्जी राखण्यासाठी वा अन्य अर्थाने ही गंभीर चूक नव्हे गुन्हा केला आहे*.
दुसऱ्या एका राजकीय नेत्यास जो गेल्या महापालिका निवडणुकीत पराभूत झाला त्याला सेवाभावी संस्थेचा पदाधिकारी म्हणून पात्र ठरवले आहे. *ज्याच्या अनधिकृत बांधकामावर महापालिकेने शिक्का मोर्तब केले, निष्काषनाची नोटीस बजावली, ज्याचा नियमितिकरणाचा अर्ज फेटाळण्यात आला, जो आपल्या अनधिकृत बंगल्याचा 2 पट शास्ती म्हणून दंड भरतो, तो या मॅडम पात्र ठरवतात, याचा आश्चर्य नव्हे तर संताप येतो.*: महाराष्ट्र महानगर पालिका अधिनियम नियम 10 ड (1) अन्वये अशी व्यक्ती नगरसेवक पदासाठी अपात्र ठरते. असे असताना आपले भवितव्य बळकट करण्यासाठी आयुक्त जर सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचे मांजर बनत असेल तर त्यांना IAS आयुक्त का व कसे म्हणू?
*आमच्या सारखा 70 वर्षाचा सामाजिक कार्यकर्ता कोणताही लोभ न बाळगता, उलट वाईटपणा स्विकारून प्रशासनास संवैधानिक सूचना करूनही शासनाकडून लाख दोन लाख वेतन,वाहन ,निवास व भत्ते घेणाऱ्या IAS आयुक्त जर असे बेकायदेशीर वर्तन करीत असतील तर नक्कीच अश्या आयुक्तांना शोभणारे नाही.*
आयुक्तांनी आपल्या अधिकाराचा गैर वापर करुन सत्ताधाऱ्यांची मर्जी संपादन करण्याचा केलेला हा बेकायदेशीर प्रयत्न आहे.*अयोग्य उमेदवारास पात्र म्हणून घोषित करणे हे त्यांचे नैतिक अध:पतन आहे, त्याबद्धल त्यांचा निषेध करावा तितका कमीच आहे*. याहून अधिक सविस्तर लिहिणे मला शोभणार नाही, म्हणून येथेच थांबतो.
दिलीप मालवणकर
ज्येष्ठ पत्रकार
9822992470

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!