बारामतीत गावठी कट्ट्यासह एक ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अपनी भाषा में पढ़े! Translate

बारामतीत गावठी कट्ट्यासह एक ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

(निलेश गायकवाड)

बारामती (प्रतिनिधी) – बारामती शहरातील तांबेनगर परिसरात बेकायदेशीरपणे गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका विधी संघर्षित बालकाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पुणे ग्रामीणच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून ४१,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या बाबत बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे गु.रजि.नं. ४५९/२०२६ भारतीय हत्यार कायदा कलम ३(१), २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचा तपशील –
पोलीस हवालदार पोपट बाळू नाळे, ब.नं. २३५७, नेमणूक – स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पुणे ग्रामीण (मो. ९६८९८९८७०२) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे.

दि. २३/०९/२०२६ रोजी सायंकाळी १६:२० वा. चे सुमारास तांबेनगर येथील गजरा पॅसिफिक कॉम्प्लेक्सच्या पाठीमागे, सचिन इलेक्ट्रिक दुकानाजवळ, बारामती येथे आरोपीकडे बेकायदा विना परवाना –

१) ४०,०००/- रु. किंमतीचा एक गावठी कट्टा (पिस्तूल, मुठीस दोन्ही बाजूस चॉकलेटी रंगाचे आवरण असलेला)
२) १,०००/- रु. किंमतीचे एक जिवंत पितळी काडतूस
असा एकूण ४१,०००/- रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.

या प्रकरणी बारामती तालुका पोलीस स्टेशनला रात्री २१:५८ वा. स्टेशन डायरी नोंद क्र. ५१/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल अंमलदार म्हणून मपोहवा काळे ब.नं. २५१७ तर तपासी अंमलदार म्हणून ग्रेड पोसई राम हरी भोसले यांची नेमणूक करण्यात आली असून, प्रभारी अधिकारी म्हणून मा. पो. नि. पवार सो हे पुढील तपास पाहत आहेत.

पुणे ग्रामीण एलसीबीच्या या कारवाईमुळे बारामतीतील अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!